Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

तपासाच्या नावाखाली पुणे पोलिसांचे पर्यटन

विश्रामबाग पोलीस ठाण्यात

महिला पोलीस अधिकाऱ्यासह तिघांची वेतनवाढ रोखली

marathinews24.com

पुणे – शहरातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणाच्या तपासासाठी सातारा येथे गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यासह तिघांनी पर्यटनस्थळे पाहण्याचा आनंद लुटल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकायांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्यासह तिघांची दोन वर्ष वेतनवाढ रोखण्याची शिक्षा दिली.

पुण्यात विक्रीसाठी आणलेली ४ पिस्टल जप्त; तस्कराला अटक – सविस्तर बातमी 

खातेनिहाय शिक्षा सुनावलेली महिला पोलीस उपनिरीक्षक, हवालदार, महिला पोलीस कर्मचारी हे विश्रामबाग पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. विश्रामबाग पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षकाकडे सोपविण्यात आला होता. घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी ४ एप्रिलला पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार आणि महिला पोलीस शिपाई हे सातारा येथे तक्रारदार महिलेसह गेले होते. तिथे पोहोचल्यानंतर पोलिसांनी जवळच्या पोलीस ठाण्याला याबाबतची माहिती कळवून त्यांची मदत घेणे घेऊन तपास करणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. एका ढाब्यावर त्यंनी जेवण केली. त्यानंतर दुपारी सव्वातीनच्या सुमारास सातारा शहरातील शाहूपूरी पोलीस ठाण्यात ते गेले.

पंचनामा करताना घटनास्थळाच्या परिसरातील रहिवाशांकडे चौकशी किंवा तपास केला नाही. या घटनेची नोंद साताऱ्यातील संबंधित पोलीस ठाण्यात करणे गरजेचे होते. त्यानंतर त्यांनी पुण्यात येणे अपेक्षित होते. मात्र, महिला पोलीस अधिकारी, हवालदार, शिपाई हे कास पठार येथे गेले. त्या वेळी तक्रारदार महिला त्यांच्यासोबत होती. ‘माझी आई आजारी आहे.ती एकटी घरी आहे. मला लवकर घरी पोहोचणे गरजेचे आहे’, असे तक्रारदार महिलेने त्यांना सांगितले. पोलिसांकडे त्यांनी विनंती केली. कास पठार, तसेच अन्य पर्यटनस्थळे पाहण्याचा आनंद लुटल्यानंतर ते महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी जेवणे करण्यासाठी गेले. त्यानंतर मध्यरात्री एकच्या सुमारास ते पुण्यात पाेहोचले. सुरुवातीला मध्यरात्री एकच्या सुमाास तक्रारदार महिलेला स्वारगेट येथे सोडण्याचा प्रयत्न केला. महिलेने विनंती केल्यानंतर तिला नारायण पेठ पोलीस चौकीत सोडून पोलीस गेले. महिलेने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यासह तिघांची चौकशी करण्यात आली. चौकशीत संबंधित प्रकार उघडकीस आला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश काय ?

‘महिला पोलीस उपनिरीक्षकांसह तिघे जण सातारा येथे जाऊन कोणत्याही प्रकारचा तपास केला नाही. मोघम स्वरुपाचा तपास केला. पर्यटनस्थळे पाहण्यात दंग होता. तक्रारदाराला बरोबर नेले. मात्र, गु्न्ह्याचा तपास केला नाही. मौजमजा केली. संबंधित पोलिसांनी कर्तव्यात बेजबाबदारपणा दाखविला. बेशिस्त, निष्काळजीपणाच्या वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन होईल, असे कृत्य केले’, असा ठपका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठेवला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×