Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

मार्केटयार्डात घरफोडी, ६ लाखांचा ऐवज चोरीला

मार्केटयार्डात घरफोडी, ६ लाखांचा ऐवज चोरीला

बंद घर फोडून ६ लाखांचा ऐवज लंपास

marathinews24.com

पुणे – बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ४० हजारांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून ६ लाख ३० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २८ ते २९ जुलैला मार्वेâटयार्डातील जय विजय इमारतीत घडली आहे. याप्रकरणी तरूणाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसाची केली बतावणी, जेष्ठाला १ कोटींचा गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कुटूंबियासह जय विजय इमारतीत ए विंगमध्ये राहायला आहेत. २८ ते २९ जुलैला त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. घरातील ४० हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून ६ लाख ३० हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुनील भापकर तपास करीत आहेत.

मेडीकलमधील लॅपटॉप, घड्याळ चोरले

मेडीकल दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी लॅपटॉप, घड्याळ असा मिळून १ लाख २२ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २९ जुलैला मध्यरात्री तीनच्या सुमारास लोहगावमधील श्री कल्याणी मेडीकल अ‍ॅड डिस्ट्रीब्युटर्समध्ये घडली आहे. याप्रकरणी धानोरीत राहणार्‍या व्यक्तीने लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

तक्रारदाराचे लोहगावमध्ये श्री कल्याणी मेडीकल असून, २९ जुलैला ते रात्री मेडीकल बंद करून घरी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या मेडीकलचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. लॅपटॉप, घड्याळ, फोन असा १ लाख २२ हजारांचा ऐवज चोरून नेला. दुसर्‍या दिवशी तक्रारदाराला मेडीकलमध्ये चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करीत आहेत.

वारजे जकात नाका परिसरात घरफोडी

दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ९० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना २४ ते २५ जुलैला वारजे जकात नाका परिसरातील बिर्ला कॉर्नर याठिकाणी घडली आहे. याप्रकरणी संबंधिताने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×