Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

फुलगावातील हॉटेलवर पोलिसांचा छापा

९५ हजारांचा विदेशी दारूसाठा जप्त

marathinews24.com

पुणे – ‘मिशन क्रॅकडाऊन’अंतर्गत परिमंडळ सातच्या हद्दीत बेकायदेशीर दारू विक्रीविरुद्ध कारवाई करण्यात आली. लोणीकंद पोलिसांनी फुलगावमधील हॉटेल जगदंबवर छापा टाकून विदेशी मद्य व बिअरचा ९५ हजार ८६० रुपयांचा साठा जप्त केला. याप्रकरणी राहुल सुरेश संदनशिव (३६, रा. फुलगाव, ता. हवेली) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

पुण्यात एमडी तस्करीच्या तयारीतील दोघांना अटक – सविस्तर बातमी

स्थानिक पोलिसांच्या नेतृत्वाखाली ‘मिशन क्रॅकडाऊन’ मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत बुधवारी (दि. १९) सायंकाळी साडेचारच्या सुमारास फुलगाव येथील हॉटेल जगदंब येथे कारवाई करण्यात आली. हॉटेलमध्ये विनापरवाना व बेकायदेशीररीत्या देशी-विदेशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने दारूसाठा करून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ९५ हजार ८६० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ खरड, पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलिस हवालदार सुशील बेंद्रे, विलास केदारी, गणेश इथापे, हरीप्रसाद पुंडे, शुभम चिनके, अमोल सरतापे आणि लालू कन्हे यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×