Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

रिक्षा उलटून प्रवाशाचा मृत्यू; चार जण जखमी

रिक्षा उलटून प्रवाशाचा मृत्यू; चार जण जखमी

रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – भरधाव रिक्षा उलटून प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावर खडकवासला भागात घडली. अपघातात चार प्रवासी जखमी झाले असून, रिक्षा चालकाविरुद्ध नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विश्वनाथ गेमू पवार (वय ५८, रा. सीडब्ल्यूपीआरएस काॅलनी, खडकवासला) असे मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे. याबाबत पवार यांचे भाऊ वसंत (वय ५२, रा. साेनवडी, ता. दौंड) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी रिक्षाचालक सागर बब्रुवान सूर्यवंशी (वय १८, रा. खडकवासला, सिंहगड रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

लष्कराच्या मेसमधून ६५ हजारांची रोकड लंपास – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव रिक्षा खडकवासला भागातील सीडब्ल्यूपीआरएसच्या प्रवेशद्वारासमोरून २७ जुलै रोजी दुपारी सायंकाळी पाचच्या सुमारास निघाली होती. प्रवेशद्वारासमोर रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटले आणि रिक्षा उलटली. अपघातात रिक्षातील प्रवासी विश्वनाथ पवार हे गंभीर जखमी झाले. प्रवासी राज विलास जावळकर, अभिषेक कुमार, भीमा गायकवाड हे किरकोळ जखमी झाले. उपचारादरम्यान पवार यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक फौजदार भापकर तपास करत आहेत.

सुश्रूषा करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून रोकड चोरीला

ज्येष्ठ नागरिकाची सुश्रूषा करणाऱ्या कर्मचाऱ्याने कपाटातील ७० हजारांची रोकड, तसेच अन्य वस्तू असा ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी कर्मचाऱ्याविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत एकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाचे वडील आजारी आहेत. ते मंगळवार पेठेतील रणजीत काॅम्प्लेक्स सोसायटीत राहायला आहेत. वडिलांची सुश्रूषा करण्यासाठी त्यांनी एका कर्मचाऱ्याला घरी ठेवले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधून कर्मचाऱ्याने कपाटातील ७० हजारांची रोकड, तसेच अन्य वस्तू असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली. रोकड चोरुन पसार झालेला आरोपी पुन्हा कामावर आला नाही. कपाटातील पैसे चोरीला गेल्यानंतर त्यांचा संशय बळावला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक बालाजी पावणे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×