Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

प्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या

प्रेमप्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या

पुण्यातील घटना; प्रियकर अटकेत

marathinews24.com

पुणे – प्रियकरासोबत झालेल्या वादातून संगणक अभियंता तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खराडी भागात घडली. प्रियकराविरुद्ध खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अमृतकुमार अरुणकुमार सिंह (वय २३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेली २३ वर्षीय तरुणी मूळचे बिहारमधील पाटणा शहरातील रहिवासी आहे. आरोपी हा मूळचा बिहारचा आहे. तरुणी आणि आराेपीने एकत्र शालेय शिक्षण घेतले होते. तरुणीने राजस्थानातून संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केला. तरुणी खराडीतील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला होती. आरोपी हा नोएडा येथील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाल आहे. तरुणी दोन महिन्यांपासून खराडीतील माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करत होती. खराडीतील एका सोसायटीत तिने भाडेतत्त्वावर सदनिका घेतली होती.

भाडेकरार केल्यानंतर ती सोमवारपासून तेथे राहायला जाणार होती. दोन दिवसांपूर्वी आरोपी तरुणीला भेटण्यासाठी नोएडाहून तरुणीला भेटण्यासाठी आला होता. गुरुवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला. वादातून आराेपीने तरुणीला मारहाण केली. त्यानंतर तरुणीने मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीच्या काकांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मोरे तपास करत आहेत.

तळजाई टेकडी परिसरात वाहनाच्या धडकेत श्वानाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत भटक्या श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना तळजाई टेकडी परिसरात घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाहन चालकाविरुद्ध मोटार परिवहन कायदा तसेच प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे धनकवडी भागात राहायला आहेत. ते तळजाई टेकडी परिसरात नियमित फिरायला जातात. २८ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास ते तळजाई टेकडी परिसरात फिरायला गेले होते. सदू शिंदे स्टेडियमसमोरील रस्त्यावर भरधाव वाहनाने एका भटक्या श्वानाला धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक संघर्षी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×