Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

केतनच्या खूनात रियल इस्टेट एजंटचा सहभाग उघड

केतनच्या खूनात रियल इस्टेट एजंटचा सहभाग उघड

सिया, चेतनच्या मित्राला अटक, १२ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी; केतन अगरवाल खून प्रकरण

marathinews24.com

पुणे – होणार्‍या नवर्‍याला लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी नेउन प्रियकराच्या मदतीने त्याला ढकलून देत खूनप्रकरणी पोलिसांनी रियल इस्टेट एजंटाला अटक केली आहे. संबंधित आरोपीचा कटात सहभाग असून, तो मुख्य आरोपींचा महाविद्यालयीन मित्र आहे. या संपुर्ण कटात तो पहिल्या दिवसापासून सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार तिसरा आरोपी रितेश हांगे (वय २३, रा. बीड ) याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर उपस्थित होते.

महावितरणच्या रोहित्रातून तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड – सविस्तर बातमी 

केतन विशाल अगरवाल (वय २५ रा. लोढा बेलमोंडो टॉवर गहुंजे, ता. मावळ) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. सिया प्रविण गोयल (वय २० रा. लिलाकुंज, ७८ / २१ न्यु एरा सोसायटी गंगाधाम समोर कोंढवा रोड, बिबवेवाडी) चेतन बाबुलाल चौधरी (वय २२, रा. पार्श्वनगर, बी ४/३०१ कोंढवा बु ता. हवेली) यांना यापुर्वी पोलिसांनी अटक केली आहे. विशाल देवीचंद अगरवाल (वय ४६) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

आरोपी रितेश हांगे हा सिया गोयल, चेतन चौधरी यांचा महाविद्यालयातील मित्र आहे. तो रियल इस्टेटमध्ये कमीशन एजंट म्हणून काम करत आहे. रिया आणि केतनचा साखरपुडा झाल्यानंतर तिघांनी मिळून केतनवर हल्ला करण्याचे प्लॅनिंग केले होते. त्यासाठी त्यांनी मारेकर्‍याला यामध्ये सहभागी करून घ्यायचे ठरवले होते. कटात आणखी काही लोकांना सहभागी करुन घेण्यासाठी संपर्क केला होता. मात्र, त्यांनी काही दिवसानंतर स्वतः प्लॅनला दिशा देण्याचा निर्णय घेतला. कट रचताना रिया, चेतन आणि रितेश पहिल्या दिवसापासून एकत्रित होते. दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी रितेशची चौकशी केली होती. मात्र, त्याला अटक करण्यापर्यंतचा पुरावा पोलिसांना मिळाला नव्हता. आता गुन्ह्यातील त्याचा सहभाग स्पष्ट झाल्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी सांगितले.

खूनाची पहिली माहिती दिली रितेशला

आरोपींनी केतनला लोहगडावरून खाली ढकलून दिल्यानंतर सर्वात आधी चेतनने रितेशला फोन केला. त्याला एका ठिकाणी भेटण्यासाठी बोलावून घेतले. त्यानंतर आरोपीने केतनला गडावरून ढकलून दिल्याची सर्व माहिती रितेशला दिली. दरम्यान, तिघेही महाविद्यालयीन मित्र असून, त्यांच्यात काही आर्थिंक देवाण-घेवाण झाली आहे का, यादृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात आहे. आरोपी रितेशला पहिल्या दिवसापासून घटनेसंदर्भात सर्व काही माहिती होते. आरोपींसोबत त्याने चर्चा केली होती.

वय २३, नोकरी रियल इस्टेट एजंट कमीशन

आरोपी रितेश हांगे हा २३ वर्षीय असून, त्याचे महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झाले आहे. खासगी क्षेत्रात रियल इस्टेटमध्ये कमीशन एजंट म्हणून तो काम करत आहे. व्यावसायिक केतन अगरवाल यांच्या खूनप्रकरणाची संपुर्ण माहिती त्याला होती. तो इतर दोघा आरोपींसोबत कटात सहभागी होती. दरम्यान, याप्रकरणी गडावर उपस्थितीत लोकांचे जबाब नोंदवले आहेत. त्यानुसार पुढील दिशा दिली जात आहे.

प्री बर्थ डे लोहगडावर नियोजन अन केला खून

आरोपी सियाने स्वतःचा १९ जूनला असलेला वाढदिवस साजरा करण्यासाठी १८ जूनलाच प्री बर्थ डे लोहगडावर नियोजन केले होते. मात्र, तिच्या मनात वाढदिवसाऐवजी केतनचा खून करण्याचा प्लॅन फिट होता. खुन करण्यापूर्वी तिने गुगलवर प्लॅनिंगची माहिती वाचून काढली होती. त्यानंतर सिया, चेतनने मिळून केतनला गडावरुन ढकलुन देउन कट पूर्णत्वाला नेला.

व्यावसायिक केतन अगरवाल यांच्या खूनातील तिसर्‍या आरोपीला अटक केली आहे. तो यापुर्वी अटकेतील दोघांचा महाविद्यालयीन मित्र आहे. तांत्रिक विश्लेषणासह जाबजबाब, इतर माहितीच्या आधारे आरोपी रितेश हांगे याचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाला. त्यानंतर त्याला अटक केली.

संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×