भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई
marathinews24.com
पुणे – गांजा तस्करी प्रकरणात पोलिसांना गेले चार महिने गुंगारा देणाऱ्या एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. हडपसर परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अजय पोपटराव पाडुळे (वय ३०, रा. नवीन म्हाडा वसाहत, हडपसर) याला अटक करण्यात आली. पाडुळे आणि त्याचा साथीदार चारुदत्त चव्हाण यांच्याविरुद्ध गांजा तस्करी प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
पुण्यात दहीहंडीत डीजेचा दणदणाट; ११६ मंडळांवर खटला दाखल – सविस्तर बातमी
चव्हाण याच्याकडून ३५ किलो गांजा जप्त करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाडुळे पसार झाला. तपासात पाडुळे हा शहरात गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. गेले चार महिने तो पोलिसांना सापडत नव्हता. पाडुळे याने वेशभूषा बदलली होती, तसेच तो समाज माध्यमाचा वापर करत नसल्याने त्याचा शोध घेण्यात अडचण आली होती. पाडुळे हा म्हाडा वसाहतीत आईला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, किरण साबळे, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, मंगेश पवार, संदीप आगळे यांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. पाडुळे याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ, लोणी काळभोर, वानवडी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून, तो या गुन्ह्यात पसार आहे. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष जाधव,उपनिरीक्षक नीलेश माेकाशी, मितेश चौधरी, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सोहम शेंडकर यांनी ही कारवाई केली.




















