खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दाेेघांविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – किरकोळ वादातून रखवालदारावर चाकूने वार करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना मांजरीतील एका सोसायटीच्या आवारात घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोन रखवालदांविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विवेकानंद प्रकाश गुंडेकर (वय ३४, सध्या रा. झेड काॅर्नरजवळ, केशवनगर, मुंढवा, मूळ रा. कंधार, जि. नांदेड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आर्यन चरणसिंग गौड, कार्तिक वीरसेन नागपुरे (दोघे सध्या रा. केशवनगर, मुंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत गुंडेकरने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
एरंडवणे भागातील बंगल्यातून ३ लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी भागातील व्हीटीपी टाऊनशिपमध्ये गुंडेकर हे रखवालदार म्हणून काम करतात. बुधवारी (९ सप्टेंबर) मध्यरात्री गुंडेकर आणि सहकारी सूरज यांनी सोसायटीच्या आवारात शेकोटी पेटविली होती. रखवादार गौड, नागपुरे यांच्याशी गुंडेकर याचा किरकोळ कारणावरुन वाद झाला. वादातून आरोपींनी गुंडेकर याच्यावर चाकूने वार केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात गुंडेकर गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड तपास करत आहेत.




















