Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

तब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंद

तब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंद

डोणजे फाट्यावर गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरासह पुणे ग्रामीण, सातारा, अहिल्यानगरमध्ये तब्बल ३० वर्षांपासून १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने डोणजे फाटा परिसरातून अटक केली. तो दोन वर्षांपासून पाहिजे आरोपी आहे. राजु बाबुराव जावळकर (वय ६०, रा. रिद्धीसिद्धी अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक ४०८, डोणजे फाटा, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

शेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली फसवणूक – सविस्तर बातमी 

पुणे शहरातील गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेकडून पाहिजे आणि फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस अंमलदार शिवानंद कायगुडे यांना ८ सप्टेंबर रोजी गोपनीय माहिती मिळाली. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी राजु जावळकर हा डोणजे फाटा परिसरात फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. कायगुडे यांनी ही माहिती गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांना दिली. त्यांनी तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पथकाला दिल्या. त्यानुसार पथकाने डोणजे परिसरात सापळा रचून जावळकरला शिताफीने ताब्यात घेतले.

जावळकर याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८४८/२०२४ दाखल आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२), ३ (५) अंतर्गत कारवाई केली आहे. दोन वर्षांपासून तो पोलिसांच्या रेकॉर्डवर पाहिजे आरोपी होता. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे, पोलिस निरीक्षक अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तेजश्री पवार तसेच पोलिस अंमलदार शिवानंद कायगुडे, शंकर नेवसे, सर्जेराव सरगर, योगेश मांढरे, महेश मंडलिक, संतोष टकले, विजय पवार, शंकर कुंभार, संदीप शिर्के, नागनाथ राख यांच्या पथकाने केली.

जावळकर हा अभिलेखावरील वाहनचोरी करणारा गुन्हेगार असून, गेल्या तीन दशकांत त्याच्याविरुद्ध विविध ठिकाणी १०० पेक्षा अधिक वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. पुणे शहर आणि ग्रामीण भागाबरोबरच सातारा, अहिल्यानगर तसेच इतर ठिकाणीही त्याच्याविरुद्ध वाहनचोरीचे गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×