Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Pune MPSC Protest : पुण्यातील तीनही आंदोलने बेकायदा; गुन्हे दाखल करणार- पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Pune MPSC Protest : पुण्यातील तीनही आंदोलने बेकायदा; गुन्हे दाखल करणार- पोलीस आयुक्त अमितेश कुमार

२९ क्लास, अभ्यासिका चालकांसह ५१ विद्यार्थ्यांना नोटिस

marathinews24.com

पुणे – Pune MPSC Protest : एमपीएससी आयोगाच्या अनागोंदी कारभाराविरोधात शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. संबंधित आंदोलने बेकायदेशीर असून, त्यांच्याविरूद्ध कारदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही काहीजणांकडून ही आंदोलने करण्यात येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी २९ क्लास व अभ्यासिका चालकांना तसेच ५१ विद्यार्थ्यांना नोटीस बजावली आहे.

‘सेवा माझे योगदान’ अभियानाला पुणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद – सविस्तर बातमी 

स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांकडून गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांकडून विविध मागण्यासह आयोगाच्या अध्यक्षाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, आंदोलनासाठी आवश्यक परवानगी घेतली नाही. Pune MPSC Protest त्यामुळे आयोजकांना आंदोलन करू नये, अशा सूचना दिल्या होत्या. तरीही आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे. एस.एम. जोशी पुलासह टिळक चौक तसेच शास्त्री रस्त्यावर हे आंदोलने सुरू आहेत. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलनचा आजचा चौथा दिवस झाला आहे.

आंदोलनाच्या ठिकाणी विविध राजकीय तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तीकडून भेट दिली जात आहे. आंदोलनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात केला आहे. आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, आंदोलनाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार्‍या क्लास आणि अभ्यासिका चालकांनाही पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. संबंधितांना पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले होते. आंदोलनाच्या ठिकाणी केलेले चित्रीकरण, आयोजकांना दिलेल्या सूचना आणि नंतर सुरू असलेले आंदोलनाची माहिती संकलित केली जात आहे . त्यानुसार गुन्हे दाखल केले जाणार आहेत. आंदोलन करण्याचा अधिकार असला तरी सार्वजनिक ठिकाणी आंदोलनासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवल्यास आयोजक आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

ड्रोनद्वारे चित्रीकरण, मालकाचा शोध सुरू

एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान संशयित ड्रोन उडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. हे ड्रोन कोणी आणि कशासाठी उडविले, यासंदंर्भात पोलिस चौकशी करत आहेत. आंदोलनाचे शुटिंग किंवा इतर कारणांसाठी हे ड्रोन उडविले असल्यास त्यावर देखील कारवाई केली जाणार आहे. ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असते. आंदोलनादरम्यान, कोणीही अशी परवानगी घेतलेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×