Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Fake Kurash Certificate Scam : अन २३ वर्षांच्या खेळाडूला चिमुरडीने उघडे पाडले

Fake Kurash Certificate Scam : अन २३ वर्षांच्या खेळाडूला चिमुरडीने उघडे पाडले

कुराश खेळ प्रमाणपत्र घोटाळा प्रकरण

marathinews24.com

पुणे – Fake Kurash Certificate Scam : कुराशचे प्रशिक्षण घेतलेल्या अवघ्या १२ वर्षांच्या मुलीसमोर २३ वर्षांची ‘खेळाडू’ उभी राहिली. कागदोपत्री ती कुराशमध्ये पारंगत होती; मात्र प्रत्यक्ष लढत सुरू होताच काही सेकंदांतच तिचा खेळ संपला. १२ वर्षांच्या मुलीने तिला सहज हरवले आणि वर्षानुवर्षे कुराशचे प्रशिक्षण घेतल्याचा दावा करणाऱ्या प्रमाण पत्रामागील बोगसगिरी उघडी पडली. या लढतीने पोलिसही अवाक झाले. केवळ एकच नव्हे, तर अशाच प्रकारे इतर संशयित ‘खेळाडूं’नाही प्रशिक्षित खेळाडूंकडून पराभव पत्करावा लागला.

पुण्यातील तीनही आंदोलने बेकायदा; गुन्हे दाखल करणार- पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी 

पुणे पोलिसांनी लढवलेली युक्‍ती ही तपासातील महत्‍वाची बाब ठरली. अन या प्रक्रीयेने कुराश बनावट प्रमाणपत्राचे पितळच पूर्णपणे उघडे पाडले. याप्रकरणात आतापर्यंत महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश विठ्ठल नागर आणि सचिव शिवाजी जयवंत साळुंखे तसेच कोल्हापूर येथील धैर्यशील आणि श्रुती पुनगावकर या दाम्पत्यालाही अटक झाली आहे. क्रीडा प्रमाणपत्रांच्या पडताळणीदरम्यान कागदपत्रांमध्ये संशयास्पद बाबी आढळल्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाची अनोख्या पद्धतीने पडताळणी करण्याचा निर्णय घेतला.

बालेवाडी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या पडताळणीनंतर पोलिस मुख्यालयात कुराशचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलेल्या आठ ते दहा खेळाडूंना बोलावण्यात आले. त्यांच्यासमोर संशयित खेळाडूंच्या प्रत्यक्ष लढती घेण्यात आल्या. कागदावर ‘विजेते’ असलेल्या काही खेळाडूंचे प्रत्यक्ष मैदानातील कौशल्य पाहताच त्यांच्या प्रमाणपत्रांमागील संशय अधिक गडद झाला. Fake Kurash Certificate Scam प्रत्यक्ष चाचणीत काही संशयित खेळाडूंना कुराशच्या प्राथमिक डावपेचांचीही माहिती नसल्याचे समोर आले. ज्या खेळाडूंनी राज्य, जिल्हा अथवा अन्य स्तरावरील स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते, त्यांना प्रत्यक्ष लढतीत साध्या हालचालीही करता येत नसल्याचे आढळले. त्यामुळे कागदावरील ‘चॅम्पियन’ आणि प्रत्यक्ष मैदानातील कामगिरी यातील मोठी तफावत पोलिसांच्या निदर्शनास आली. खरे प्रशिक्षण घेणारे खेळाडू वर्षानुवर्षे सराव, मेहनत आणि स्पर्धांमधून स्वतःला घडवत असताना केवळ पैशांच्या जोरावर प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकरीच्या रांगेत पुढे जाण्याचा हा प्रकार पुणे पोलिसांनी उघड केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×