सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास, पोलिसांकडून तपास सुरू
marathinews24.com
पुणे – House Burglary : घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने, रोकड असा पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना गोखलेनगरमधील जनवाडी भागात घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सहकारनगरमध्ये ज्येष्ठ महिलांचे दागिने हिसकावले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाचे जनवाडी भागातील अरुण कदम चौकात घर आहे. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घर बंद करुन ते नातेवाईकांकडे गेली. सायंकाळी ते घरी परतले. तेव्हा घराचे कुलूप तोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. (House Burglary) चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेले. घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. जनवाडी भागात दाटीवाटीने घरे आहेत. घरफोडी करणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल पाटील तपास करत आहेत.






















