Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Seva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृती

Seva Sankalp Abhiyan

बारामती आणि इंदापूरमधील रक्तदान शिबिरांत १०७ रक्तपिशव्यांचे संकलन

marathinews24.com

बारामती – Seva Sankalp Abhiyan : महिला आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, अवयवदान आणि रक्तदान यांसारख्या महत्त्वाच्या आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक बांधिलकी व सेवाभाव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, यांच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले.

चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णी – सविस्तर बातमी

स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाच्या वतीने महिला आरोग्य व स्वच्छतेबाबत जनजागृती तसेच समुपदेशन करण्यात आले. महिलांना आरोग्याची काळजी, वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळीतील स्वच्छता आणि विविध आरोग्यविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचा १४० महिलांनी लाभ घेतला. स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. दांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

दरम्यान भूशास्त्र विभागाच्या वतीने वैद्यकीय व नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी अवयवदान या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. Seva Sankalp Abhiyan अवयवदानाचे महत्त्व, गरज, प्रक्रिया तसेच अवयवदानाबाबत असलेले गैरसमज याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमानंतर वैद्यकीय व नर्सिंग विद्यार्थ्यांनी अवयवदानाची शपथ घेतली.

सेवा संकल्प अभियानांतर्गत रक्तदानाबाबतही विशेष जनजागृती करण्यात आली. बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात ३६ रक्तपिशव्यांचे संकलन झाले. तर इंदापूर येथे आयोजित रक्तदान शिबिरात ७१ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. या माध्यमातून नियमित रक्तदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले. रक्तसंकलन व संबंधित वैद्यकीय प्रक्रियेसाठी पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ. नाकते यांचे मार्गदर्शन व समन्वय लाभला. विविध विभागांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांचे नियोजन व देखरेख जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×