Breking News
रॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खून

घरफोडीप्रकरणी आरोपीला अटक, बंडगार्डन पोलिसांची कामगिरी

बुटात चावी ठेवणे अंगलट, दोन लाखांची घरफोडी

आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी केली अटक 

marathinews24.com

पुणे – रेल्वे तिकीट आरक्षण केंद्र असलेल्या फ्लॅटमध्ये घरफोडी करून रोख रक्कम व लॅपटॉप चोरी करणाऱ्या आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. सोमनाथ योगेश चौधरी (वय २२, रा. गोपाळपट्टी, मांजरी) याला अटक केली. त्याच्याकडून लॅपटॉप, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. पोलिसांच्या तपास पथकाने केलेल्या कौशल्यपूर्ण कामगिरीमुळे अवघ्या काही दिवसांत हा गुन्हा उघडकीस आला.

अफुच्या बोंडाचा चुरा बाळगणारा तस्कर अटकेत – सविस्तर  बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगरकर नगरात चोरट्याने रेल्वेचे बुकींग करणाऱ्या फ्लॅटच्या दरवाज्याची कडी तोडून लॅपटॉप आणि रोकड असा ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी राकेशकुमार भगवतीप्रसाद (वय ३७, रा. उल्हासनगर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, प्रदीप शितोळे, ज्ञाना बडे, मनोज भोकरे यांच्या तपास पथकाने ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त राजेश बनसोडे, सहायक आयुक्त दीपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×