Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

शस्त्राच्या धाकाने तरूणाला लुटले, वानवडीतील घटना

मद्य विक्री दुकानातील कामगाराला मारहाण

आरोपी स्वारगेट पोलीस कॉलनीमध्ये राहायला

marathinews24.com

पुणे – तरूणाला शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करीत त्याच्याकडील साडेतीन हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना २७ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास वानवडीतील भैरोबानाला परिसरातील एएफएमसी बसस्थानक परिसरात घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी स्वारगेट पोलीस कॉलनीमध्ये राहणार्‍या रिक्षा चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. किसन सुरेश नुया (वय ३२, रा. स्वारगेट पोलीस कॉलनी आउट हाउस) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुलचंद राठोड (वय ३७, रा. वारजे माळवाडी ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

तरूणाला शेअर मार्केटचे आमिष पडले २६ लाखांना – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार राठोड वारजे माळवाडीत राहायला असून, २७ मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास एएफएमसी बसस्थानक परिसरात थांबले होते. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या आरोपी किसन नुया याने त्यांना शस्त्राचा धाक दाखविला. मला पैसे दे नाहीतर तुला मी मारून टाकेल, अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर आरोपीने राठोडला मारहाण करून जबरदस्तीने त्यांच्या खिशातील साडेतीन हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा ठावठिकाणा शोधला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×