Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

दहशत माजवणार्‍या आकाश थोरात टोळीवर मोक्का

दागिने चोरट्यांना बेड्या, ५ गुन्हे उघडकीस

पूर्ववैमनस्यातून तरुणाचा केला होता खुन, ११ जणांवर कारवाई

marathinews24.com

पुणे– पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार करुन त्याचा खुन करणार्‍या व आंबेगाव परिसरात दहशत माजविणार्‍या आकाश थोरात टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई केली आहे. टोळीप्रमुख आकाश भरत थोरात (३२, रा. अटल चाळ, आंबेगाव खुर्द), अजित अंकुश धनावडे (वय २४) आदित्य जालिंदर शिंदे (वय १८) रोहित बाळासाहेब कचरे (वय २१) विशाल ऊर्फ।गोड्या दीपक गणेचारी (वय २१) यांच्यासह ६ अल्पवयीन मुलांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे. टोळीतील अजित धनावडे हा फरार आहे.यश खंडु कांबळे (२३, रा. कात्रज) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोंढव्यात घरफोडी, १० लाख ७५ हजारांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी 

कांबळेचे मित्र आदित्य काकडे व साहिल काकडे, सार्थक ऊर्फ ओम नितीन पंडित (१९, रा. अटल चाळ, कात्रज) यांचा ग्रुपआहे. एक वर्षापूर्वी काकडेच्या पानटपरीवर आदित्य शिंदे हा।गेला होता. त्यावेळी त्यांच्यामध्ये झालेल्या भांडणातून आदित्य व साहिल काकडे यांनी आदित्यला मारहाण केली होती. त्यानंतर यश कांबळे व सार्थक पंडित हे ५ एप्रिल २०२५ रोजी रात्री साडेदहा वाजता दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी आकाश थोरात यांच्या साथीदारांनी दुचाकी अडवून ‘‘तुम्हाला लय मस्ती आली का, तुमचे मित्र आदित्य काकडे, साहिल काकडे यांनी आमचे मित्र आदित्य।शिंदे याला मारहाण केली आहे.

आम्हाला आमच्या भाईंनी बघुन घ्यायला।सांगितले आहे. आम्ही तुम्हाला जीवंत सोडत नसतो,’’ असे म्हणून काही।अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्राने कांबळे व सार्थक पंडित यांच्यावर।जीवघेणा हल्ला केला. त्यात हे दोघे गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरु असताना सार्थक पंडित याचा मृत्यु झाला होता.

आकाश थोरात टोळीतील टोळी प्रमुख व टोळीतील इतर साथीदारांवर २०१५ पासून १० गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. आकाश थोरातने त्याच्या टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या गुन्हेगार साथीदारांची मदत घेतली. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्या तरी त्यांच्या बेकायदेशीर कारवाया वाढत होत्या. त्यापार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यामार्फत टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्याकडे पाठविला.

प्रस्तावाची छाननी करुन टोळीवर मोक्का कारवाईचा आदेश राजेश बनसोडे यांनी दिला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त अतुल नवगिरे, राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमुले, सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, सहायक।पोलीस फौजदार चंद्रकांत माने, पोलीस हवालदार ढमढेरे, पोलीस अंमलदार अजय सावंत, आबासाहेब खाडे यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×