Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

गावठी दारू विक्री प्रकरणात दोघे अटकेत

गावठी दारू विक्री प्रकरणात दोघे अटकेत

महंमदवाडी भागात गावठी दारू विक्री – पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात 

marathinews24.com

पुणे – गावठी दारू विक्री प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली. हडपसर भागातील महंमदवाडी, सय्यदनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. सुलतान सादिक बागवान (वय ३३, रा. सय्यदनगर, हडपसर), कुंदन निकलेश गौतम (वय २८, रा. कृष्णानगर, महंमदवाडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पुण्यातील कथित आरटीआय कार्यकर्ता ललित ससाणेविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

काळेपडळ पोलिसांचे पथक सय्यदनगर भागात गस्त घालत होते. त्या वेळी बागवान हा गावठी दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून साडेसात हजार रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली. कुंदन गौतम हा महंमदवाडी भागात गावठी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून पाच हजार रुपयांची गावठी दारू जप्त केली. दोघांविरुद्ध पोलिसांनी मुंबई दारूबंदी अधिनियम कलमान्वये गु्न्हा दाखल केला असून, वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी १२ हजार ५१० रुपयांची गावठी दारू जप्त केली. पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील आणि पथकाने ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×