फरासखाना ठाण्याच्या हद्दीत कारवाई
marathinews24.com
पुणे – मेफेड्रॉन तस्करीसाठी आलेल्या एकाला अमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली आहे. त्याच्याकडून १२ लाख १२ हजार रूपये किंमतीचे ६० ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले आहे. शरणप्पा नागाप्पा कटिमणी (वय ३४ रा. आप्पा दुगड शाळेजवळ, कात्रज, पुणे. मुळ रा. मु. पो. भापंर गल्ली, जि. गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
गुंतवणुकीच्या आमिषाने ठेवीदारांची १० कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी
अंमली पदार्थ विरोधी पथक दोन १४ जूनला फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सय्यद साहिल, नजीर शेख यांना मेफेड्रॉन तस्कराची माहिती मिळाली.
अमली विरोधी पथकाने बुधवार पेठ, बाटा बोळ, लक्ष्मी रोड परिसरात छापा टाकून शरणप्पा नागाप्पा कटिमणी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १२ लाख १२ हजारांचे एमडी जप्त करण्यात आले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, एपीआय नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड, चेतन गायकवाड, मयुर सुर्यवंशी, साहिल शेख, उदय राक्षे, संदिप शेळके, अझिम शेख, योगेश मांढरे, युवराज कांबळे, आझाद पाटील, निलम पाटील, दिशा खेवलकर, रविंद्र रोकडे यांनी केली आहे.
अमली पदार्थाची तस्करीसाठी आलेल्या आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्याकडून जवळपास ६० ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले असून, तो एमडीची कोठे विक्री करणार होता. त्याने कोणाकडून अमली पदार्थ आणले आहे, याची माहिती काढली जात आहे. – सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक दोन























