Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

दुचाकीवरून जबरी चोरी करणारे अटकेत, युनीट ४ ची कामगिरी

दोन मोबाइल, दुचाकी जप्त

marathinews24.com

पुणे – दुचाकीवरून प्रवास करीत मोबाइल हिसकावून नेत जबरी चोरी करणार्‍या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनीट चारने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन मोबाइल, दुचाकी असा ८० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सद्दाम इसाफ पठाण (वय २८ रा. सुरक्षानगर, येरवडा) आणि रोहित किरण पवार (वय १९ रा. अशोकनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वरिष्ठांच्या सुचनेनुसार हद्दीतील कायदा सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे युनीट चारचे पथक पेट्रोलिंग करीत होते.

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी

युनीट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी पथकाला घरफोडी करणारे, वाहन चोरी, मोबाईल चोरी, जबरी चोरी करणारे, मोक्का केस मधील जामीनावर सुटलेले आरोपी, एमपीडीलमधील स्थानबध्दता संपुष्टात आलेले आरोपी तसेच खून, खुनाचा प्रयत्न, शरीराविरुध्दचे गुन्हे, दरोडा, दरोडयाची तयारी, खंडणी, अपहरण, घरफोडी प्रकरणातील आरोपींची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १ जुलैला पथक येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अमजद शेख, देविदास वांढरे, यांना मोबाईल हिसकवणारे दोघे चोरटे डेक्कन कॉलेजच्या मोकळया आवारामध्ये असल्याची माहिती मिळाली.

दोन्हीही चोरटे एकाच दुचाकीवर असून, जबरी चोरीत त्यांचा सहभाग असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी धाव घेत सद्दाम इसाफ पठाण आणि रोहित किरण पवार यांना ताब्यात घेतले. आरोपी पवारकडे मोबाइल मिळून आला, चौकशीत त्याने ८ दिवसापुर्वी सावंत पेट्रोल पंप ते कॉमर्स झोन रोडने पायी चाललेल्या तरूणाचा मोबाइल हिसकावल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन मोबाइल, दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मिसाळ, एसीपी राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, उपनिरीक्षक वैभव मगदुम, प्रविण राजपुत, एकनाथ जोशी, प्रविण भालचीम, विठ्ठल वाव्हळ, किशोर दुशिंग, अमजद शेख, वैभव रणपिसे, देवीदास वांढरे, मयुरी नलावडे यांनी केली. दुचाकीवर प्रवास करीत पादचार्‍याचा मोबाइल हिसकावून नेत जबरी चोरी करणार्‍या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन मोबाइल, दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे. – अजय वाघमारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, युनीट चार

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×