पुणे रेल्वे स्थानकाबाहेरील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

पुणे रेल्वे स्थानकाबाहेरील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

माथेफिरुकडून कोयत्याने केली तोडफोड, आरोपी ताब्यात

marathinews24.com

पुणेपुणे रेल्वे स्थानकाबाहेरील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना – पुणे रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची एका माथेफिरुने विटंबना केली आहे. पुतळ्यावर त्याने कोयत्याने मारून तोडफोड केल्याची रविवारी दि. ६ रात्रीच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी माथेफिरू सूरज शुक्ला (वय ३२, उत्तर प्रदेश) याला बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपीच्या कृत्याचे विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी यांच्यावतीने निषेध नोंदवला आहे.

ऊसतोडणीला न आल्याने मजुराचे अपहरण करणारे अटकेत – सविस्तर बातमी 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शुक्ला हा रविवारी दि. ६ रात्रीच्या सुमारास रेल्वे स्थानकाच्या परिसरात कोयता घेऊन आला होता. त्यावेळी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात अनेक प्रवासी होते. माथेफिरू शुक्ला हा महात्मा गांधींचा पुतळा असलेल्या चौथऱ्याजवळ गेला. त्याने पुतळ्यावर कोयत्याने मारून पुतळ्याची विटंबना केली. याप्रकरणी नागरिकांनी तातडीने रेल्वे पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी आरोपी सुरज शुक्ला याला चौथऱ्यावरुन खाली उतरवून ताब्यात घेतले. त्याने पुतळ्याच्या छातीवर आणि पायाने कोयत्याने तोडफोड करीत विटंबना केली आहे.

माथेफिरू सुरज शुक्ला मूळचा उत्तर प्रदेशातील

माथेफिरू शुक्ला मूळचा उत्तर प्रदेशातील वाराणसीचा असून, नोकरीसाठी पुण्यात आला होता. तो रुद्राक्षांच्या माळा आणि धार्मिक पुस्तकं विकत होता. काही दिवस तो सातारामधील वाईत राहायला होता. पुण्यात आल्यानंतर त्याने कोयता विकत घेऊन पुतळ्याची विटंबना केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर तपासाला गती दिली आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीला रविवारी दि. ६ रात्रीच ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. – रंजनकुमा शर्मा, सहपोलीस आयुक्त, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×