Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पळताना ठेच लागून पडल्याने चोरटा पोलिसांच्या हाती

तामिळनाडूतील चोरट्याकडून पाच लॅपटाॅप जप्त

marathinews24.com

पुणे – वाघोली परिसरातून लॅपटाॅप चोरणाऱ्या चोरट्याला तामिळनाडूतील चोरट्याला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो पळाला. पळताना ठेच लागून पडल्याने तो पोलिसांच्या हाती लागला. चोरट्यच्या पिशवीतून दोन लाख रुपयाचे चार लॅपटाॅप जप्त करण्यात आले.

आंबेडकर राष्ट्रीय स्मारकांच्या मागणीसाठी हजारो भीमसैनिकांचे ठिय्या आंदोलन – सविस्तर बातमी

सागर नागराज (वय ३१, रा. महादनुर, ता. अंबुर, जि. वेल्लुर, तामिळनाडु) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. वाघोली परिसरातील एका वसतिगगृहातून नागराज याने पाच लॅपटाॅप लांबविले होते. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल झाला नव्हता. पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर परिसरात चिंतामणी पार्कजवळ पोलीस गस्त घालत होते. त्या वेळी नागराज तेथे थांबला होता. पोलिसांनी त्याला पाहिले. त्याच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. पोलिसांना पाहताच तो पळाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पळताना ठेच लागून नागराज पडला. पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडील पिशवीची पोलिसांनी तपासणी केली. तेव्हा पिशवीत पाच लॅपटाॅप सापडले. चौकशीत त्याने १२ ऑगस्ट रोजी पहाटे

वाघोली येथील एका सोसायटीतील सदनिकेतून लॅपटाॅप चोरल्याची कबुली दिली. चोरट्याकडून चार लॅपटाॅप जप्त करण्यात आले. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, गु्न्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्मिता पाटील,, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस कर्मचारी सातपुते, वणवे, भोसले, माने, जगदाळे, देवीकर, शिरगिरे, कुदळे, वीर, पाटील, कुंभार, गाडे, कर्डिले, सोनवणे, दडस, थोरात ही कामगिरी केली.

पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लंपास

पीएमपी प्रवासी महिलेच्या पिशवीतून दोन लाख २६ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना कात्रज बसस्थानकात घडली. याबाबत एका महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सांगली जिल्ह्यातील कडेगावच्या रहिवासी आहेत. १० ऑगस्ट रोजी त्या पतीसोबत पुण्यात आल्या होत्या. कात्रज पीएमपी स्थानकातून त्या वडगाव मावळकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवेश करत होत्या. त्या वेळी चोरट्यांनी गर्दीत महिलेच्या पिशवीतून दोन लाख ३६ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. पोलीस उपनिरीक्षक कळमकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×