Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

पिस्तूल बाळगणारे तरुण गजाआड

अल्पवयीनाकडून पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त

कात्रज भागात खंडणी विरोधी पथकाची कारवाई

marathinews24.com

पुणे – बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या दोन तरुणांना गु्न्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कात्रजमधील आंबेगाव परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि काडतूस जप्त केले.
शुभम राजेंद्र बेलदरे (वय २९, रा. दत्तनगर, जांभुळवाडी रस्ता, आंबेगाव), मयूर ज्ञानोबा मोहोळ (वय २३, रा. नऱ्हे रस्ता, धायरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पळताना ठेच लागल्याने चोरटा पोलिसांच्या हाती – सविस्तर बातमी

खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी मयूर भोकरे आणि रहीम शेख हे कात्रज भागात गस्त घालत होते. त्या वेळी दोघे जण थांबले असून, त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती भोकरे आणि शेख यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. दोघांनी पिस्तूल का बाळगले, तसेच त्यांनी कोणाकडून आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सहायक निरीक्षक राजेश माळगावे, उपनिरीक्षक रामेश्वर पारवे, रणजीत फडतरे, रहीम शेख, मयूर भोकरे, विजय कांबळे, नितीन बोराटे, नितीन कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार यांनी ही कामगिरी केली.

वैमनस्यातून टोळक्याकडून एकावर हल्ला

वैमनस्यातून टोळक्याने एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना लोहगाव भागात घडली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भाऊसाहेब गोपीनाथ राखपसरे (वय ४८, रा. मोझे आळी, लोहगाव) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. खुनाचा प्र्रयत्न केल्याप्रकरणी नितीन सकट, निकेश पाटील, गणेश सखाराम राखपसरे, ओंकार उर्फ खंड्या खांडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊसाहेब राखपसरे यांची आरोपींशी भांडणे झाली होती. राखपसरे यांनी दिलेल्या तक्रारीमुळे आरोपींविरुद्ध पोलिसांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली होती. या कारणावरुन नितीन, निकेश, गणेश, ओंकार आणि साथीदार चिडले होते. आरोपींनी १३ ऑगस्ट राेजी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्यावर लोहगाव भागात हल्ला केला. त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन आरोपी पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे तपास करत आहेत.

पसार झालेल्या आरोपींचा माग काढण्यात येत आहे. शहरात किरकोळ वादातून खुनाचा प्रयत्न, खून अशा घटना वाढीस लागल्या आहेत. किरकोळ वादातून कात्रज भागात एका तरुणाचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×