Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

शिवाजीनगर परिसरात बसमध्ये शिरताना जेष्ठेचे मंगळसूत्र हिसकावले

प्रवासी महिलांकडील ३ लाखांचे दागिने चोरी

अज्ञात चोरट्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसमध्ये प्रवेश करताना चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या गळ्यातील ८० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना १५ ऑगस्टला संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुणे महानगरपालिका बसस्थानक परिसरात घडली आहे. याप्रकरणी पिंपळे गुरव परिसरात राहणार्‍या ७० वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी घेतला आढावा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला पिंपळे गुरव परिसरातील रहिवाशी असून, १५ ऑगस्टला संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुणे महानगरपालिका बसस्थानक परिसरातून बसची वाट पाहत थांबली होती. आकुर्डीच्या दिशेने जाणारी बस आल्यानंतर महिला बसमध्ये प्रवेश करीत होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ८० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. काही वेळानंतर महिलेला मंगळसूत्राची चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक कोळेकर तपास करीत आहेत.

हडपसरमध्ये घरफोडी, पावणेदोन लाखांचा ऐवज चोरीला

बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाखाची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख ८९ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ११ ते १२ ऑगस्ट कालावधीत हडपसरमधील इंदिरानगर गल्ली क्रमांक सातमध्ये घडली आहे. याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हडपसरमधील इंदिरानगरमधील गल्ली क्रमांक सातमध्ये राहायला आहेत. ११ ते १२ ऑगस्टला महिलेचे घर बंद असताना, चोरट्यांनी कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील एक लाखाची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख ८९ हजारांचा ऐवज चोरून नेला. दुसर्‍या दिवशी महिलेला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस अमलदार गाढवे तपास करीत आहेत.

बांधकाम साईटवरील २ लाखांचे साहित्य चोरीला

इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाहून चोरट्यांनी दोन लाखांचे लोखंडी साहित्य चोरून नेले आहे. ही घटना १६ ते १८ ऑगस्ट कालावधीत प्रभात रस्त्यावरील चंद्रभागा अपार्टमेंटच्या नवीन साईटवर घडली आहे. याप्रकरणी ३० वर्षीय तरूणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभात रस्त्यावरील चंद्रभागा अपार्टमेंटच्या नवीन साईटचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी विविध क्लॅम्प मेटल आणि बेंड ठेवले होते. चोरट्यांनी सुरक्षारक्षकाची नजर चुकवून बांधकाम साईटवरील दोन लाखांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी माहिती झाल्यानंतर संबंधित साईटवरील तरूणाने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अमलदार शिंदे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×