१३ वर्षाच्या मुलाला कामावर ठेवणे भोवले, मालकावर गुन्हा दाखल

घरून काम करण्याचे आमिष पडले १७ लाखांना

काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – हॉटेलमध्ये १३ वर्षाच्या बालकाला कामावर ठेऊन त्याच्याकडून काम करून घेणार्‍या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन हनुमंत होळकर (रा. होळकरवाडी) याच्यावर काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रतन दाजिबा यादव (२९, रा. वारजे) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

शेअर ट्रेडींगचे आमिष पडले १ कोटी ५७ लाखांना – सविस्तर बातमी 

तक्रारदार हे एक सामाजिक कार्यकर्ते असून ते कम्युनिटी कमिटेड डेव्हलपमेंट ट्रस्ट मुंबईच्या विश्रांतवाडी शाखेत फिल्ड वर्कर म्हणुन काम करतात. त्यांच्या ट्रस्टच्या वतीने बालकामगार तसेच काळजी व संरक्षणाची आवश्यकता असणारे बालक यांचे बचाव कार्य तसेच बाल विवाह रोखण्याचे काम करतात. दि. १० ऑगस्ट रोजी तक्रारदारांच्या मुंबई येथील ऑफीसला गुप्त बातमीदरारामार्फत माहिती मिळाली. त्यांना हांडेवाडी चौकाजवळ असलेल्या प्रेमाच्या चहा या चहाच्या दुकानात एका बालकाकडुन काम करून घेतले जात आहे. त्यानंतर कामगार उपायुक्त यांच्याकडे लेखी तक्रार झाल्यानंतर दि. १९ ऑगस्ट रोजी कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकान निरीक्षक राजेंद्र ताठे, दिपक पोळ व अलका गवारी यांनी त्यांच्या पथकाने पोलिस ठाण्यात याबाबत कळवून संबंधीत चहाच्या दुकानावर धाड टाकली.

१३ वर्षाचा मुलगा काम करताना आढहला. मुलगा हा मुळचा उत्तर प्रदेशातील असल्याचे यावेळी पथकाच्या लक्षात आले. याबाबत मुलाला किती दिवसापासून काम करत आहे असे विचारले असता त्योन प्रेमाचा चहा येथे पंधरा दिवसांपासून काम करत असल्याचे सांगितले. त्याला दुकान मालकाकडून ९ हजार रूपये मिळत असल्याचेही त्याने सांगितले. याप्रकरणी दुकान मालक निती होळकर यांनी मुलाकडून कमी वेतनात जास्त श्रमाचे काम करून घेऊन त्याचे आर्थिक व मानसिक व शारीरीक शोषण करत असल्याचे दिसुन आले. आता याप्रकरणी अल्पवयीन न्याय कायदा २०१५ च्या ७९ आणि भारतीय न्यायसंहिता कलम १४६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×