Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

विवाहाच्या दाखवले आमिष, महिलेची ३ लाखांची फसवणूक

विवाहाच्या दाखवले आमिष, महिलेची ३ लाखांची फसवणूक

पोलिसांकडून माहिती तंत्रज्ञान कायदा आणि फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – विवाहाच्या आमिषाने चोरट्याने महिलेची ३ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. बाणेर पोलिसांकडून माहिती तंत्रज्ञान कायदा आणि फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात खरेदीसाठी गेलेल्या महिलांकडील ऐवज चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बाणेर भागात राहायला आहेत. चोरट्याने महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. पुतण्याचा विवाह करायचा आहे, असे चोरट्याने महिलेला सांगितले होते. आरोपीने एका नामवंत इलेक्ट्राॅनिक कंपनीत कामाला असल्याची बतावणी केली होती.

त्यानंतर महिलेला जाळ्यात ओढून विवाहसाठी काही इलेक्ट्राॅनिक वस्तू खरेदी करायच्या आहेत, असे सांगून महिलेकडून वेळोवेळी तीन लाख २३ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले. महिलेने पैसे जमा केल्यानंतर तिला इलेक्ट्राॅनिक वस्तू देण्यात आल्या नाहीत. महिलेने मोबाइल क्रमांकाव संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. महिलेने नुकतीच बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

ज्येष्ठ महिलेची ४६ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कर्वेनगर भागात राहायला आहेत.

सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर १७ जून रोजी संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले होते. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला ऑनलाइन पद्धतीने बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. सुरुवातीला महिलेला परताव्यापोटी रक्कम मिळाल्याचे आरोपींनी भासविले.

प्रत्यक्षात महिलेला परतावा दिला नाही. महिलेने महिनाभरात ४६ लाख रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे तपास करत आहेत. शेअरबाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×