Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

‘एक वही, एक पेन’ उपक्रमास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा उत्साहवर्धक प्रतिसाद

गणेशोत्सवात समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे सहकार्य

marathinews24.com

मुंबई – समाजातील गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी सुरू असलेल्या ‘एक वही, एक पेन’ या उपक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोलाचा हातभार लावला आहे.

महिला सक्षमीकरणासाठी ठोस दिशा – सविस्तर बातमी

गणेशोत्सवाच्या निमित्ताने हारफुलांसह शैक्षणिक साहित्य श्री गणेशचरणी अर्पण करून वंचित विद्यार्थ्यांना मदत करण्याचा संदेश या अभियानातून दिला जातो. या उपक्रमाच्या शिष्टमंडळाने, प्रणेते पत्रकार राजू झनके यांच्या नेतृत्वाखाली, डॉ. गोऱ्हे यांच्या शासकीय निवासस्थानी भेट दिली.

मागील दहा वर्षांत हजारो विद्यार्थ्यांना मदत पोहोचविणाऱ्या या अभियानाचे डॉ. गोऱ्हे यांनी कौतुक करत शिक्षणापासून कोणताही घटक वंचित राहू नये, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी स्वतः शैक्षणिक साहित्य देऊन सहभाग नोंदवला तसेच समाजालाही आवाहन केले की, “गणेशोत्सवात हारफुलांसह शैक्षणिक साहित्य अर्पण करून वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावा.” या भेटीत शिष्टमंडळात अविनाश गरुड, राजेश उबाळे, राजू लोखंडे, सुनील वाकोडे, पत्रकार काशिनाथ म्हादे, सुरेश ठमके आदी मान्यवर उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×