Breking News

कोंढव्यात दुकानदाराकडे खंडणी मागून तोडफोड

५ जणांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – टोळक्याने दुकानदाराकडे ५० हजारांची खंडणी मागून तोडफोड केल्याची घटना कोंढव्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोहेल शेख उर्फ पठाण (वय २७), साथीदार बल्ब यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोणी काळभोर मध्ये वादातून तरुणाला मारहाण – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाचे कोंढव्यातील अश्रफनगर परिसरात दुकान आहे. आरोपी पठाण आणि साथीदार २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दुकानात आले. तरुणाकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. तरुणाने खंडणी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी दुकानातील टेबल, तसेच सीसीटीव्ही स्क्रीनची तोडफोड केली. तरुणाला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी दुकानासमोर दहशत माजविली.

त्यामुळे परिसरातील दुकानदारांनी घाबरून त्यांची दुकाने बंद केली. आराेपी दुचाकीवरुन पसार झाले. घटनेनंतर फिर्यादी दुकानदाराच्या भावाने आरोपीशी संपर्क साधला. दुकानात तोडफोड का केली ? अशी विचारणा केली. तेव्हा आरोपी पठाणने त्याच्याकडे ५० हजारांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास सर्वांना जिवे मारू, अशी धमकी त्याने दिली. पोलीस उपनिरीक्षक खोपडे तपास करत आहेत.

कोंढव्यातील मीठानगर भागात अल्पवयीनांमध्ये झालेल्या वादातून दहशत माजविण्यात आल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. टोळक्याने मीठानगर भागातील रस्त्याच्या कडेला लावलेल्या तीन रिक्षा आणि दोन मोटारींच्या काचा फोडल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×