शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या हातातील १ लाखांची सोन्याची बांगडी चोरून नेली आहे. ही घटना २२ ऑगस्टला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मंगला थिएटर जवळील बसस्थानकावर घडली आहे. याप्रकरणी आळंदी रस्ता परिसरात राहणार्या ६२ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घरून काम करण्याचे आमिष पडले १७ लाखांना – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला आळंदी रस्ता परिसरात राहायला असून, २२ ऑगस्टला कामानिमित्त शिवाजीनगर परिसरात आल्या होत्या. काम संपल्यानंतर पुन्हा घरी जाण्यासाठी महिला मंगला थिएटरजवळील बसस्थानकात थांबल्या होती. गाडी आल्यानंतर बसमध्ये प्रवेश करीत असताना चोरट्यांनी महिलेच्या हातातील १ लाखांची सोन्याची बांगडी काढून घेतली. महिलेला बांगडीची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी हिरे तपास करीत आहेत.
बँकखात्यातील ६ लाख ऑनलाईनरित्या काढून घेतली
बँकखात्यात असलेली ६ लाख ३६ हजारांची रक्कम एकाने ऑनलाईनरित्या युपीआयवरून काढून घेत फसवणूक केली आहे. ही घटना १५ मे ते २६ जुलै कालावधीत कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे वडील कोंढव्यात राहायला असून, १५ मे ते २६ जुलै कालावधीत एकाने त्यांच्या वडिलांचा मोबाइल ताब्यात घेतला. त्यांच्या बँक खात्यातील ६ लाख ३६ हजारांची रक्कम ऑनलाईनरित्या काढून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख तपास करीत आहेत.























