Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

शाळेतील वाद उफाळून आला, चुलत्यावर केला वार

शाळेतील वाद उफाळून आला, चुलत्यावर केला वार

शिवाजीनगर रेल्वे क्वॉटरर्स परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – पुतण्यासोबत सहा महिन्यांपुर्वी शाळेत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून टोळक्याने चुलत्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. ही घटना ११ नोव्हेंबरला रात्री पावणेअकराच्या सुमारास शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. याप्रकरणी एका अल्पवयीनासह दोघांविरूद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करा, न्यायालयाचे आदेश – सविस्तर बातमी 

अभिषेक गणेश दोरास्वामी (वय १९, रा. रेल्वे क्वॉटरर्स शिवाजीनगर) आणि सोनू नेटके (वय १९ रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय हनुमंता अलगुडे (वय ३२ रा. शिवाजीनगर ) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अजय आणि त्यांचा मित्र ११ नोव्हेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास रेल्वे क्वॉटर्रजवळ गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी अभिषेकने सहा महिन्यांपुर्वी अजयच्या पुतण्यासोबत शाळेत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याला गाठले. त्यांच्यावर लोखंडी शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर हातातील हत्यार हवेत फिरवून माज करता काय, कोणालाही सोडणार नाही, एकाएकाला मारणार अशी धमकी देउन दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×