Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार

पुण्यात बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार

कोथरूडमधील महाविद्यालयाच्या परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – शहरात बारावीची परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना कोथरूड भागातील महाविद्यालयाच्या परिसरात मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले.

स्वतः च्या अपहरणाचा केला बनाव; बाणेर पोलिसांनी केली अटक – सविस्तर बातमी 

हल्ल्यात जखमी झालेला १८ वर्षीय तरुण आणि अल्पवयीन आरोपी हे वारजे भागातील एका शाळेत शिक्षण घेत होते. दहावीत असताना त्यांच्यात वाद झाला होता. मंगळवारी दुपारी कोथरूड भागातील एका महाविद्यालयाच्या परिसरात अल्पवयीनांनी तरुणाला अडवले. त्याला शिवीगाळ करुन त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत तो किरकोळ जखमी झाला, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. अल्पवयीनांनी केलेल्या हल्ल्यात विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे. आरोपींकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. त्यांनी कोयता कोठून आणला, याबाबत त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×