Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

स्वतः च्या अपहरणाचा केला बनाव; बाणेर पोलिसांनी केली अटक

फुकट गोवऱ्या-लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यावर सत्तूरने हल्ला

स्वतः च्या अपहरणाचा बनाव; कुटुंबीयांकडून दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी

marathinews24.com

पुणे – अपहरणाचा बनाव करुन कुटुंबीयांकडून दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तरुणाला बाणेर पोलिसांनी गजाआड केले. आरोपी तरुण मूळचा उत्तर प्रदेशातील असून, तो पुण्यात सुरक्षाक्षक म्हणून काम करतो. मनीषकुमार द्विवेदी (रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बाणेर भागात द्विवेदी सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. ९ फेब्रुवारीला तो उत्तर प्रदेशात निघालो असल्याचे सांगून कामावरून निघाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अनोळखी क्रमांकावरून द्विवेदीचा भाऊ आणि वडिलांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविण्यात आला.

स्पा सेंटरमधील महिलेचा मृत्यू; सीआयडीकडून चौकशी – सविस्तर बातमी 

‘तुमच्या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. मुलगा जिवंत हवा असेल, तर त्वरित दोन लाख रुपये द्या. पोलिसांना माहिती दिल्यास त्याला जिवे मारू,’ अशी धमकी त्यांना देण्यात आली. धमकीचा संदेश पाठविण्यात आल्यानंतर वडिलांनी या बाबतची माहिती बाणेर पोलिसांना दिली. त्यानंतर बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक तपासात द्विवेदी हा पुण्यात आसल्याची माहिती मिळाली. तो अहमदाबादहून प्रयागराजला गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. द्विवेदीला ताब्यात घेऊन पुण्यात आणण्यात आले. चौकशीत त्याने स्वत: अपहणाचा बनाव रचल्याचे उघडकीस आले. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त रजनीकांत चुलूमुला, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अलका सरग, सहायक निरीक्षक कैलास डाबेराव, गणेश रायकर, बाबासाहेब आहेर, किसन शिंगे, गणेश गायकवाड, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, प्रदीप खरात यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×