Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

स्पा सेंटरमधील महिलेचा मृत्यू; सीआयडीकडून चौकशी

स्पा सेंटरमधील महिलेचा मृत्यू; सीआयडीकडून चौकशी

महिलेच्या पतीची पोलिस आयुक्तांकडे तक्रार

marathinews24.com

पुणे – शहरातील स्पा सेंटरच्या नावे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर विमानतळ पोलिसांनी सोमवारी (दि.२३) धाड टाकली होती. त्यावेळी इमारतीच्या गॅलरीतून खाली उडी मारलेल्या महिलेचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने मंगळ‍वारी (दि.२४) घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तर मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीने देखील पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. घटनास्थळावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज जप्त करून त्याचे फॉरेन्सिक परिक्षण करावे, घटनास्थळी उपस्थित सर्व पोलिस अधिकारी आणि व्यक्ती त्यांचे जबाब नोंदवावेत अशा विविध मागण्यात त्यांनी केल्या आहेत.

काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण द्या – सविस्तर बातमी 

महिलेबरोबर खाली उडी मारताना हुसेन शेख हा देखील जखमी झाला असून, तो या स्पाचा मॅनेजर असल्याची माहिती आहे.
ही घटना अहिल्यानगर रोड विमानतळ परिसरातील सिटी स्पेस बिल्डिंग पहिला मजला द रुटस स्पा येथे सोमवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली होती. सिटी स्पेस बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावर द रुटस स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्या वेळी तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव, महिला अंमलदार पंचासमक्ष स्पावर कारवाई करण्यासाठी सिटी स्पेस बिल्डिंगमध्ये दाखल झाले.

पोलिसांनी स्पाचा दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला; मात्र कोणी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे पोलिसांनी काचेचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, तेथे चार पीडित महिला आणि चार पुरुष आढळून आले. त्याच वेळी पोलिसांना एका केबीनचा दरवाजा लावलेला दिसला. त्यांनी दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला. परंतु तो दरवाजा देखील कोणी उघडला नाही. त्यामुळे तो दरवाजाही तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला. त्यावेळी एक महिला त्यांना आढळून आली. दोघेजण गॅलरीमार्गे खाली उतरत असताना पोलिसांनी पाहिले. तेव्हा त्यांना दोघे जण खाली पडल्याचे दिसून आले. त्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष होता. पोलिसांनी तत्काळ धाव घेत दोघांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. चौकशीत पायाला दुखापत झालेला पुरुष हा स्पा मॅनेजर असल्याचे समोर आले. त्यानंतर दोघांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×