Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण द्या

काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण द्या

काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे पोलीस आयुक्तांना निवेदन

marathinews24.com

पुणे – काँग्रेसचे प्रवक्ते हणमंत पवार यांना मारहाण केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तुषार दामगुडे याच्यासह सहाजणांविरुद्ध पोलिसांनी सोमवारी ( दि. २३) गुन्हा दाखल केला. याप्रकाराची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी दामगुडेचे पिस्तूल व परवाना जप्त केला आहे. दरम्यान, याप्रकरणी पवार यांना पोलीस संरक्षण देऊन आरोपींविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मंगळवारी ( दि. २४) पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली.

श्री क्षेत्र देहूत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पाणी वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू – सविस्तर बातमी 

तुषार दामगुडे, बाळासाहेब गालफाडे, गौरव राठोड, श्रीनिवास निगडे, ऋषिकेश परदेशी आणि अभिमन्यू मैड यांच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते हणमंत पवार यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी दामगुडे व त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेतले होते. त्यांना नोटीस बजावून सोडून देण्यात आले. दैनिकाच्या मित्रमंडळ येथील कार्यालयाबाहेर सोमवारी ( दि. २३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला.

चर्चेसाठी दामगुडे व पवार यांना पाचारण करण्यात आले होते. चर्चा संपल्यानंतर पवार बाहेर आले. त्यावेळी दामगुडे याने पिस्तुलाच्या धाकाने त्यांना धमकावून मारहाण केली. त्यावेळी दामगुडे याच्यसॊबत असलेल्या अन्य पाचजणांनीही पवार यांना बेदम मारहाण केली. त्यावेळी काही माध्यमकर्मींनी तेथे धाव घेऊन पवार यांना वाचवले.

घटनेचे वृत्त समजल्यावर अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांचयसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पवार यांच्यावरील हल्ल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केल्याशिवाय आपण हलणार नसल्याची भूमिका काँग्रेसने घेतली. त्यानंतर, पवार यांची सविस्तर फिर्याद नोंदवण्यात आली. संबंधित घटनेचे सीसी टीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन आरोपींविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली. तसेच, प्रवक्ते पवार यांना पोलीस संरक्षण देण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. महाशिवरात्रीच्या दिवशी काँग्रेस भवनजवळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली दगडफेक व हणमंत पवार यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय सलोखा धोक्यात आला असून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची पोलिसांनी बैठक घ्यावी असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच, दोन्ही प्रकरणात पोलिसांनी गुंडगिरिला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तींविरुद्ध कडक कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी दिला.

माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, संजय बालगुडे, नगरसेवक प्रशांत जगताप, रफिक शेख, महिला अध्यक्ष स्वाती शिंदे, मेहबूब नदाफ, अविनाश बागवे, अक्षय जैन, नुरुद्दीन सोमाजी आदी यावेळी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×