Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

भरदिवसा तरुणावर गोळ्या झाडून, सपासप वार करून खून

बीडमधील घटनेने पुन्हा खळबळ

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जिल्हा पुन्हा एकदा हत्येच्या घटनेने हादरला असून, शहरातील अंकुशनगर भागात ३८ वर्षीय तरुणाची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून आणि शस्त्राने वार करून हत्या केली. ही घटना मंगळवार (दि.६) भरदुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घटनेने संपूर्ण खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हर्षद शिंदे (वय ३८ वर्षे रा. धानोरा रोड, हाउसिंग कॉलनी, बीड) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

इन्स्टाग्रामवर मुलीचा फोटो केला अपलोड; ट्रॅपद्वारे रचला खुनाचा कट – सविस्तर बातमी

हर्षद हा बीड नगरपालिकेत प्लंबिंगचे काम करत होता.
दुपारच्या सुमारास तो शिवाजीनगर रोडवर कामात मग्न होता. त्यावेळी हत्येचा कट रचून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. हर्षदवर दोन गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात धावपळ उडाली. जखमी अवस्थेत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हर्षद जवळच असलेल्या एका पत्र्याच्या शेडच्या पाठीमागे गेला. मात्र, हल्लेखोराने त्याचा पाठलाग सोडला नाही. त्याठिकाणी त्याला गाठून धारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केले.

हल्ल्यात हर्षद जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. बीडचे अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक पूजा पवार, पोलीस निरीक्षक बांगर यांनी तातडीने घटनास्थळ पाहणी केली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. हत्येचा प्रकार अत्यंत नियोजित वाटत असल्याने पुराव्यांची जुळवाजुळव करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला बोलावण्यात आले होते. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने, गोळ्यांच्या पुंगळ्या आणि तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत. हत्येचे कारण अस्पष्ट असल्याने हर्षद शिंदे याची हत्या कोणी केली आणि त्यामागे नेमका कोणाचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

जुन्या वादातून ही हत्या झाली की यामागे काही वेगळे कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. दिवसाढवळ्या रहदारीच्या ठिकाणी गोळीबार आणि हत्या झाल्याने बीडमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेचा शिवाजीनगर पोलीस संशयितांचा शोध घेत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे मृताच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×