Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

इन्स्टाग्रामवर मुलीचा फोटो केला अपलोड; ट्रॅपद्वारे रचला खुनाचा कट

इन्स्टाग्रामवर मुलीचा फोटो केला अपलोड; ट्रॅपद्वारे रचला खुनाचा कट

पुण्यात अल्पवयीन मुलाचे अपहरण करून हत्या; दोघांना बेळगाव मधून अटक

marathinews24.com

पुणे – इन्स्टाग्रामवर मुलीचा फोटो अपलोड करीत टोळक्याने एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केले. त्यानंतर टोळक्याने त्याला खेड परिसरात नेउन खून करीत मृतदेह जमीनीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने दोघांना बेळगावमधून अटक केली असून, दोन अल्पवयीनाना ताब्यात घेतले आहे. अमनसिंग सुरेंद्रसिंग गचंड वय १७, रा. टिंगरेनगर विश्रांतवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे.

मोबाइल हिसकावणार्‍याला २४ तासांत केली अटक – सविस्तर बातमी 

प्रथमेश चिंधु आढळ (वय १९, रा.उत्तमनगर) आणि नागेश बालाजी धबाले वय १९, रा. शिवणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने ९ जानेवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.याप्रकरणी अनिता गचंड यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपींच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमनसिंगने चार महिन्यांपुर्वी एकाचा खूनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी त्याच्याविरूद्ध उत्तमनगर पोलीस ठाण्यातंर्गत गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, आरोपींनी वचपा काढण्यासाठी इन्स्टाग्रामवर मुलीचा फोटो वापरून फेक अकाउंट तयार केले. त्याद्वारे अमनसिंगला चॅटिंग करण्यास सुरूवात केली. त्यांच्यात काही दिवस चॅटिंग झाल्यानंतर संबंधित मुलगी भासवलेल्या आरोपीने अमनसिंगला २९ डिसेंबरला कात्रज परिसरात भेटायला बोलावले. त्यानुसार अमनसिंग कामाला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला. मुलीला भेटण्यासाठी तो कात्रजमध्ये गेल्यानंतर आरोपींनी त्याला घेरून अपहरण केले.

टोळक्याने अमनसिंगला खेड-शिवापूर परिसरात नेउन त्याच्या डोक्यात दगड मारून, कोयत्याने वार करीत खून केला. त्यानंतर परिसरातील शेतात पाणी अडवण्यासाठी केलेल्या चारीत टोळक्याने अमनसिंगचा मृतदेह पुरला. दरम्यान, मुलाची शोधाशोध करूनही तो सापडत नसल्यामुळे कुटूंबियांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत ३१ डिसेंबरला मिसिंगची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्यामुळे संबंधित कुटूंबियांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी भेट घेतली होती. त्यानंतर गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांकडून तपासाला गती दिली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे पथकाने अमनसिंगच्या संपर्कात असलेल्या आरोपींचा माग काढला. त्यांना बेळगाव मधून अटक केली. संबंधित टोळक्याने अमनसिंगच्या खूनाची कबुली दिली आहे.

इन्स्टाग्रामद्वारे ट्रॅप लावला

हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर मुलीचा फोटो वापरून फेक अकाउंट तयार केले. त्यानंतर अमनसिंगला मेसेज करून मुलगी असल्याचे भासवले. काही दिवस चॅटिंग केल्यानंतर अमनसिंगला संबंधित मुलगी भासवणार्‍या आरोपींनी कात्रज परिसरात भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर २९ डिसेंबरला अमनसिंग मुलीला भेटण्यासाठी गेला असता, टोळक्याने त्याचे अपहरण केले. त्याला खेड-शिवापूर परिसरात नेउन खून करीत मृतदेह पुरून टाकला. दरम्यान, अमनसिंगचा पुरलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात येणार आहे. त्यासाठी तहसिलदारांची परवानगीनुसार प्रक्रिया केली जाणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×