मध्यवर्ती बाजीराव रस्त्यावरील घटना
marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती बाजीराव रस्त्यावर भरदिवसा तरुणावर कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली. घटनेनंतर परिसरात घबराट उडाली. मयंक सोमदत्त खरारे (वय १७ रा. साने गुरुजीनगर, आंबीलओढा) असे ठार झालेल्याचे नाव आहे.
गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणीची ४ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंक आणि त्याचा मित्र अभिजित संतोष इंगळे (वय १८,रा. दांडेकर पूल) हे बाजीराव रस्त्यावर टेलीफोन भवनजवळ थांबले होते. दुपारी दोनच्या सुमारास तिघांंनी मयंक याच्यावर कोयत्याने वार केले. भांडणात मध्यस्थी करणारा मयंकचा मित्र अभिजित याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयंक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.




















