Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

क्रेनचा पट्टा तुटल्याने अपघात; सळई पडून महिलेचा मृत्यू

विश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खून

क्रेन चालकासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसर येथील रामटेकडी ओैद्योगिक वसाहतीच्या आवारात लोखंडी जिन्याचे काम करताना क्रेनचा पट्टा तुटल्याने सळई डोक्यात पडून कामगार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातास जबाबदार ठरल्या प्रकरणी वानवडी पोलिसांनी क्रेन चालकासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला.वैशाली मारुती भोसले (वय ४७, रा. गोसावी वस्ती, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत भोसले यांचा मुलगा चेतन मारुती भोसले (वय २१) याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बिबवेवाडीत घरफोडी; १६ लाखांचे दागिने चोरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील रामटेकडी ओैद्योगिक वसाहतीत एका खासगी कंपनीत वैशाली भोसले काम करत होत्या. कंपनीच्या आवारात मागील बाजूस लोखंडी जिना तयार करण्याचे काम १८ फेब्रुवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास सुरू होते. सकाळी अकराच्या सुमारास वैशाली भोसले आणि सहकारी कंपनीच्या आवारातून पिण्याचे पाणी आणण्यासाठी निघाल्या होत्या. क्रेन चालक लोखंडी जिना तयार करण्यासाठी सळई उचलत होता. त्या वेळी अचानक क्रेनचा पट्टा तुटला. पट्टा तुटल्यानंतर क्रेनने उचलेली सळई वैशाली यांच्या डोक्यात पडली. दुर्घटनेत वैशाली गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. क्रेन चालक, ठेकेदार यांनी पुरेशा सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे चौकशीत उघड झाले. त्यानंतर क्रेन चालक, ठेकेदार, तसेच संबधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×