शिवाजीनगर मतदार संघातील पात्र मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन

शिवाजीनगर मतदार संघातील पात्र मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन

पात्र मतदारांनी ६ नोव्हेंबरपूर्वी मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंदणी करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – ऑक्टोबर (जिमाका, वृत्तसेवा): पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ अंतर्गत पदवीधर तसेच शिक्षक मतदार नोंदणी करण्यास सुरुवात झाली असून शिवाजीनगर मतदार संघातील पात्र मतदारांनी ६ नोव्हेंबरपूर्वी मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंदणी करण्याचे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी पदवीधर व शिक्षण विधानसभा मतदरासंघ तथा २०९ शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.

क्लस्टर पद्धतीने लागवड करावयांच्या पिकांच्या लागवडीला गती द्यावी – सविस्तर बातमी 

शिवाजीनगर मतदार संघाकरीता एकूण ९ मतदान केंद्रे आहेत. शिक्षक मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता शिक्षक मतदारांसाठी नमुना क्र. १९ व पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता नमुना क्र. १८ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

पदवीधर मतदार नोंदणीसाठी भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून १ नोव्हेंबर २०२५ पूर्वी किमान ३ वर्षापूर्वी पदवीधर झालेला किंवा पदवीशी समकक्ष शैक्षणिक पात्रता धारण करणारा पदवीधर पात्र राहील. १ नोव्हेंबर २०२५ च्या लगत पूर्वीच्या सहा वर्षांतील किमान तीन वर्ष माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या अशा राज्यातील कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत अध्यापन केलेल्या प्रत्येक शिक्षक मतदार यादीत नाव नोंदविण्यास पात्र आहेत. मतदान केंद्रांसाठी पदनिर्देशित अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. गुरव यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×