Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिनात सुमारे ५ हजार नागरिक सहभागी

सर परशुराम महाविद्यालय मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

marathinews24.com

पुणे – ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित पुणे महानगरपालिका व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, विविध योग संस्था तसेच संघटना यांच्या सहकार्याने सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये सुमारे ५ हजार नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारणाची कामे गतीने पूर्ण करा-मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर – सविस्तर बातमी

यावेळी खासदार प्रा.मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासणे, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव संजय शेटे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, उपायुक्त माधव जगताप, डॉ. संतोष टेंगले, डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रा. कुलकर्णी यांनी, नागरिकांनी योगा केल्यामुळे आरोग्य सदृढ राहते, मन प्रसन्न राहते, जीवनात सकारात्मक विचार करण्यास प्रोत्साहन मिळते, त्यामुळे नागरिकांनी दररोज योगा करावे असे आवाहन त्यांनी केले. महापौर नागपुरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

‘फिट इंडिया मूव्हमेंट’ला प्रोत्साहन

देशव्यापी ‘फिट इंडिया मूव्हमेंट’च्या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या निर्देशानुसार आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी जिल्ह्यात साजरा करण्यात आला. योग ही सर्वांगीण आरोग्य व कल्याणासाठी जीवनपद्धती म्हणून प्रोत्साहित करण्याचा या दिनाचा उद्देश आहे. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य व सामाजिक सहभाग यासाठी योग ही एक प्रभावी चळवळ म्हणून उदयास आली आहे, असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.

यावेळी विविध प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, शाळेतील विद्यार्थी, खेळाडू, प्रशिक्षक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, युवक, युवती, महिला, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि क्रीडाप्रेमी आदींनी सहभाग नोंदवला.

मुख्य योग प्रशिक्षक मनाली देव यांच्या मार्गदर्शनाखाली ६० योग प्रशिक्षकांकडून प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून योगा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

पुणे महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सेवाभावी शैक्षणिक संस्था, योग संस्था, क्लब, मंडळे, अकॅडमी, तालुक्यांचे क्रीडा संकुल, क्रीडा मंडळे, क्रीडा संघटना तसेच युवक व महिला मंडळांनी विविध ठिकाणी स्थानिक पातळीवर योग सत्रांचे आयोजन करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×