रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी बंडा जोशी यांचा सत्कार

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी बंडा जोशी यांचा सत्कार

‘झेंडूची फुले‌’ या विडंबन कविता संग्रहास 100 वर्षे पूर्ण; या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

marathinews24.com

पुणे – ज्येष्ठ रंगकर्मी, एकपात्री कलावंत बंडा जोशी यांच्या धम्माल विनोदी विडंबन गीतांचा ‌‘झेंडूची नवी फुले‌’ या एकपात्री कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या प्रयोगानिमित्त रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम रविवार, दि. 9 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. बंडा जोशी यांचा सन्मान ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते करण्यात येणार असून ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम रानडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे सन्मानाचे स्वरूप आहे.

आयएफएससी एशियन के चॅम्पियनशिप 2025 : तिसऱ्या दिवशी भारताची सहा पदकांची कमाई – सविस्तर बातमी 

आचार्य अत्रे लिखित ‌‘झेंडूची फुले‌’ या विडंबन कविता संग्रहास 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ‌‘झेंडूची नवी फुले‌’ या हास्य मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×