मांजरी बुद्रूक परिसरातील गोडबोले वस्तीनजीक घटना
marathinews24.com
पुणे – शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांचा धुडगूस कमी झाला नसून, पादचारी महिलांना लक्ष्य करीत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, मंगळसूत्र हिसकावून नेले जात आहे. विशेषतः दिवसाढवळ्या लुटमारीच्या घटना घडत असल्यामुळे बीट मार्शलसह स्थानिक पोलिसांच्या तपास पथकाच्या कामागिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. दुचाकीस्वार चोरट्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी प्राधान्य देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्ता ओलांडणार्या तरूणाला हायवाने चिरडले – सविस्तर बातमी
रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी तिच्या गळ्यातील १ लाखांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना ७ ऑक्टोबरला रात्री साडेदहाच्या सुमारास मांजरी बुद्रूक परिसरातील गोडबोले वस्तीनजीक घडली आहे. याप्रकरणी २६ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार दोघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजनुसार त्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २६ वर्षीय महिला मांजरी बुद्रूक परिसरात राहायल आहे. ७ ऑक्टोबरला रात्री साडेदहाच्या सुमारास तक्रारदार महिला रस्त्याने पायी जात होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेला गोसावी वस्तीजवळ अडविले. त्यांच्या गळ्यातील १ लाखांचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे सुसाट पसार झाले. महिलेने आरडाओरड करेपर्यंत चोरट्यांनी दूरवर अंतर कापले होते. याप्रकरणी महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. पोलीस अमलदार कांबळे तपास करीत आहेत.



















