मोटार चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल
marathinews24.com
पुणे – भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वाघोलीतील केसनंद रस्त्यावर घडली. याप्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. संदीप मनोजभाई पटेल (वय ३९, रा. न्याती सोसायटी, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत महेश ज्ञानेश्वर संकपाळ (वय ३७, रा. न्याती सोसायटी, वाघोली) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तरुणाच्या खून प्रकरणाचा दोन तासात छडा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार संदीप पटेल हे शनिवारी (२० जून) दुपारी पावणेबाराच्या सुमारास वाघोलीतील केसनंद रस्त्याने निघाले होते. त्या वेळी भरधाव मोटारीने दुचाकीस्वार पटेल यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पटेल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. पसार झालेल्या मोटारचालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक रेश्मा इंगळे तपास करत आहेत.
दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू
पुणे-दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद भागात घडली. राधाकिसन घाडगे (वय ६५, रा. लोणीकंद, पुणे-अहिल्यानगर रस्ता ) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा अंबादास (वय ४०) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधाकिसन घाडगे हे शुक्रवारी (१९ जून) सायंकाळी सातच्या सुमारास लोणीकंद परिसरातून निघाले होते. श्री म्हसोबा मंदिरासमोर रस्ता ओलांडणाऱ्या घाडगे यांना दुचाकीने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या घाडगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.




















