Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

पुण्यात बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश

पुण्यात बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश

१६ लाखांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त, २९ जण ताब्यात

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसर परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत कॉल सेंटरचा गुन्हे शाखेच्या युनीट पाचने पर्दाफाश केला आहे. घटनास्थळाहून २९ लॅपटॉप, २० संगणक, ४१ मोबाईल, ७ राऊटर व इतर ईलेक्ट्रीक साहित्य असा १५ लाख ७७ हजारांचे साहित्य जप्त के ले आहे. निर्मल अजय शहा (वय. ३८ रा. कुमार पिकासो सोसायटी हडपसर) अतुल प्रविणभाई श्रीमाळी (वय ३० रा. लेबरनम पार्क सोसायटी मगरपट्टा) युगंधर संजय हादगे ( वय ३४ रा. शोभा निवास, शिवकृष्ण हौसिंग सोसायटी मांजरी) यांच्यासह २९ जणांना ताब्यात घेतले.

बस प्रवासादरम्यान महिलेचे मंगळसूत्र चोरले – सविस्तर बातमी 

हडपसरमधील मार्वल फिगो बिल्डींगमध्ये अवैद्यरित्या अमेरीकन ज्येष्ठ नागरिकांच्या मोबाईल , लॅपटॉप, संगणकात मालवेअर (पॉपअप ) टाकले जात होते. त्यांना फोन करुन मालवेअरची भिती घालुन त्यांच्या फोन,संगणकामधील माहिती, बँक अकाऊंट डिटेल्स व क्रेडीड कार्डचे डिटेल्स चोरीला जाण्याची भिती दाखवली जात होती. वेगवेगळया प्रकाराचे अ‍ॅन्टीव्हायरस, प्रोटेक्शन अ‍ॅप तसेच सेटींग सांगुन नागरिकांकडुन क्रिप्टो करन्सी (आभासी चलन) हे त्यांचे बायनान्स (ट्रस्ट वॉलेट ) यावर स्विकारुन त्यांची आर्थिक फसवणुक केली जात होती. याप्रकरणी गुन्हे शाखेला अनधिकृत कॉल सेंटरची माहिती मिळाली.

गुन्हे शाखेच्या युनीट पाचने अनाधिकृत कॉल सेंटरवर छापा टाकून २९ लॅपटॉप, २० संगणक, ४१ मोबाईल, ७ राऊटर असे साहित्य जप्त केले. कॉल सेंटरचे चालक मालक निर्मल शहा, अतुल श्रीमाळी, युगंधर हादगे यांच्यासह २९ जणांना ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, एसीपी राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक संजय पतंगे, एपीआय अमोल रसाळ, एपीआय छबु बेरड,उपनिरीक्षक प्रमोद खरात, उपनिरीक्षक संतोष तानवडे, उपनिरीक्षक अभिजीत पवार राजस शेख, प्रशांत कर्णवर, तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, शहाजी काळे, प्रताप गायकवाड,अमर चव्हाण, पृथ्वीराज पांडुळे, विनोद शिवले, विनोद निंभोर, शशिकांत नाळे, पल्लवी मोरे, स्वाती तुपे, अमित कांबळे, उमाकांत स्वामी, अकबर शेख, गणेश माने, परमेश्वर कदम,राजेश लोखंडे, कैलास चव्हाण, संतोष होले, गणेश गोसावी, दत्तात्रय खरपुडे,सुनिल महाडीक यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×