Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

पुण्यात पोलीस अन सराईतामध्ये सिनेस्टाईल गोळीबार

पुण्यात पोलीस अन सराईतामध्ये सिनेस्टाईल गोळीबार

आरोपीला अटक, वानवडीतील घटना

marathinews24.com

पुणे – घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईताला पकडण्यासाठी वानवडी पोलीस आणि सराईत गुन्हेगारामध्ये सिनेस्टाईल गोळीबाराची घटना रविवारी (दि.२१) पहाटेच्या सुमारास घडली आहे. आरोपीला पकडताना पोलीस आणि चोरट्यामध्ये झटापट झाली. त्यानंतर अधिकार्‍याने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्यामुळे आरोपी करण सिंग हा जखमी झाला आहे. त्याला ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेत पोलीस अधिकारी किरकोळ जखमी झाला आहे.

योग मानवतेचा धागा घट्ट करणारी वैश्विक भाषा-प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया – सविस्तर बातमी 

वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास सराईत आरोपी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्यावर ३० पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. तो आल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली असता, सराईताने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्याचवेळी प्रसंगावधान राखून संबंधित पोलीस अधिकार्‍याने स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या दिशेने गोळी झाडली. करण सिंग असे जखमी झालेल्या आरोपीचे नाव असून यावर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

तब्बल ३० पेक्षा जास्त गंभीर गुन्हे

सराईत करण सिंग याच्याविरूद्ध तब्बल ३० पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असून, त्यामध्ये सर्वाधिक घरफोडींच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. सराईत रविवारी पहाटेच्या सुमाास वानवडी परिसरात येणार असल्यामुळे पोलिसांनी फिल्डिंग लावली होती. मात्र, पोलीस पथक पाठलाग करत असल्याची चाहूल लागताच, त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अधिकार्‍याने गोळीबार केल्यामुळे आरोपी जखमी झाला. त्यानंतर त्याला तत्काळ ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले.

रिक्षाप्रवासात जेष्ठेचे दागिने चोरले

रिक्षा प्रवासात दोन महिलांनी जेष्ठ महिलेच्या पिशवीतील दीड लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना १९ जूनला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास खराडी बायपास ते मुंढवा नदी ब्रीज प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी नेवासा तालुक्यातील भेंडा गावातील ७५ वर्षीय नागरिकाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोन महिलांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक पत्नीसह १९ जूनला सकाळी अकराच्या सुमारास खराडी ते हडपसर असा रिक्षा प्रवास करीत होते. त्यावेळी रिक्षात असलेल्या दोन महिलांनी दाम्पत्याची नजर चुकवून त्यांच्या पिशवीतील दीड लाखांचे दागिने चोरून नेले. काही अंतरावर रिक्षातून खाली उरतल्यानंतर दाम्पत्याला दागिने चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अमलदार गुंडाळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×