Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

योग मानवतेचा धागा घट्ट करणारी वैश्विक भाषा-प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

‘सुर्यदत्त’मध्ये ‘सुर्यभारत सूर-संगम पीसॅथॉन २०२६’ चा विश्वविक्रम

marathinews24.com

पुणे – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे आयोजित ‘सूर्यभारत सूर-संगम पीसॅथॉन २०२६’ या अभिनव उपक्रमाने विश्वविक्रमाची नोंद केली. योगाच्या माध्यमातून शांतता, सौहार्द, राष्ट्रीय एकात्मता आणि ‘विविधतेतून एकता’चा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात २,०२६ हून अधिक विद्यार्थी व शिक्षक साधक प्रत्यक्ष आणि ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले.

जिल्हा परिषद येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न – सविस्तर बातमी

यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची ‘योग फॉर हेल्दी एजिंग’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक आणि विविध संस्थांमधील हितचिंतकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आयुष्यभर निरोगी शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य जपण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्याबरोबरच सामाजिक सलोखा, शांतता आणि सकारात्मक जीवनमूल्यांचा प्रसार करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

एकवीस भारतीय भाषांमध्ये सादर करण्यात आलेले ‘मल्टीलिंग्वल योग प्रोटोकॉल’ हे यंदाच्या उपक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. मराठी, संस्कृत, पंजाबी, काश्मिरी, हिंदी, भोजपुरी, कोकणी, कन्नड, तेलुगू, बंगाली, ओडिया, इंग्रजी, गुजराती, मैथिली, मल्याळम, सिंधी, मारवाडी, गढवाली, हरियाणवी, छत्तीसगढी आणि मगधी या भाषांमधून योगसत्रांचे संचालन करण्यात आले. भारताच्या भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडविणाऱ्या या उपक्रमाने ‘अनेक भाषा, एक श्वास आणि एकच शांततेचा संदेश’ ही संकल्पना प्रभावीपणे मांडली.

कार्यक्रमादरम्यान सहभागींच्या उपस्थितीत भव्य ‘मानवी तिरंगा’ साकारण्यात आला. या उपक्रमातून राष्ट्रीय अभिमान, एकात्मता आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चा संदेश देण्यात आला. विविध भाषा, संस्कृती आणि परंपरा असल्या तरी मानवतेला जोडणारा समान धागा म्हणजे शांतता, प्रेम आणि योग असल्याचा संदेश या सामूहिक योगसत्रातून देण्यात आला. ‘व्हेअर डायव्हर्सिटी मूव्ह्ज इन हार्मनी टुवर्ड्स पीस’ ही संकल्पना कार्यक्रमातून प्रभावीपणे अधोरेखित झाली. योगासन स्पर्धेत विद्यार्थी गटातून भक्ती परदेशी (फिजिओथेरपी, प्रथम वर्ष) हिने प्रथम, अनिश त्रिंबस्कडे (बारावी, वाणिज्य शाखा) याने द्वितीय, तर शिवानी गणेश वाघमारे (फिजिओथेरपी, द्वितीय वर्ष) याने तृतीय क्रमांक पटकवला. प्राध्यापक गटातून डॉ. सुनेत्रा गायतोंडे (एमबीए) व प्रा. अमर शिंदे (एमसीए), प्रा. सारंग मुळावेकर (एससीएचएमटीटी), ऋचा वर्ष्णेय (सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेज) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. सर्व विजेत्यांचे प्रा. डॉ. संजय चोरडिया आणि सुषमा चोरडिया यांनी अभिनंदन केले.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला. योगाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती, भावनिक स्वास्थ्य, मानसिक स्थैर्य, सजगता, निरोगी वृद्धत्व आणि सामाजिक ऐक्य वाढविण्यावर कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योग प्रशिक्षक सोनाली ससार, मीनल गावंडे आणि सविता गांधी यांनी विशेष परिश्रम घेतले. सहभागींचे प्रशिक्षण, योगसत्रांचे समन्वयन, सराव सत्रे आणि कार्यक्रमाचे नियोजन यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सूर्यदत्त मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्सच्या अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतिक्षा वाबळे यांच्या नेतृत्वात उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

या उपक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना, व्यापक सहभाग आणि सामाजिक परिणाम लक्षात घेऊन ‘इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड्स’ संस्थेने ‘लार्जेस्ट सिंक्रोनाइझ्ड योगा इव्हेंट प्रमोटिंग युनिटी इन डायव्हर्सिटी – सूर्यभारत सूर-संगम पीसॅथॉन २०२६’ या उपक्रमाची ‘मास अटेम्प्ट’ प्रकारात अधिकृत विश्वविक्रम म्हणून नोंद केली.

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, ‘‘योग ही सर्व सीमा, भाषा आणि संस्कृतींच्या पलीकडे जाऊन मानवतेला एकत्र आणणारी वैश्विक भाषा आहे. आजच्या अस्थिर आणि तणावग्रस्त जागतिक वातावरणात शांतता, करुणा, सौहार्द आणि निरोगी वृद्धत्व यांचे महत्त्व अधिक वाढले आहे. ‘योग फॉर हेल्दी एजिंग’ ही संकल्पना प्रत्येक व्यक्तीला आयुष्यभर योगाचा अंगीकार करून शारीरिक सशक्तता, मानसिक लवचिकता आणि भावनिक संतुलन साधण्याचा संदेश देते. ‘सूर्यभारत सूर-संगम पीसॅथॉन २०२६’सारखे उपक्रम सामूहिक आरोग्य आणि सामाजिक ऐक्याला बळ देत अधिक निरोगी, शांततापूर्ण आणि एकसंघ समाज घडविण्यास मदत करतात.’’

या कार्यक्रमाला प्रत्यक्ष तसेच विविध डिजिटल माध्यमांवरून मोठा प्रतिसाद मिळाला. ‘मेनी व्हॉइसेस… वन ब्रीथ… वन पीस’ हा सूर्यदत्तचा संदेश देश-विदेशातील सहभागींपर्यंत पोहोचविण्यात कार्यक्रम यशस्वी ठरला. या ऐतिहासिक उपक्रमाद्वारे सूर्यदत्तने सर्वांगीण शिक्षण, राष्ट्रनिर्माण, निरोगी जीवनशैली, सामाजिक सलोखा आणि जागतिक शांततेप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली आहे, असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×