Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

आयुक्तालयाची इमारत, नवीन पोलिस ठाणी अजित दादांमुळेच

विभागीय अधिस्विकृती समितीच्या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

पोलिस आयुक्तांकडून आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली

marathinews24.com

पुणे – राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात याच ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला होता. पोलिस दलासाठी त्यांनी 300 वाहने दिली. आयुक्तालयाच्या नविन इमारतीचे काम, नवीन पोलिस ठाणी, मनुष्यबळ यासाठी मोठ्याप्रमाणात निधी उपलबद्ध करून दिला. त्यांनी पोलिस दलासाठी घेतलेले निर्णय कायम स्मरणात राहतील असे मत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले.

पोलीस आयुक्तांनी घेतली तळीरामांची शाळा – सविस्तर बातमी

सोमवारी (दि.02) दुपारी पोलिस मुख्यालयात रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अमितेश कुमार बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

अमितेश कुमार म्हणाले, अजित पवारांच्या कामाची शैली उल्लेखनिय होती. त्यांच्याकडे आम्ही अधिकाराने पोलिस खात्यासाठी मागणी करायचो. त्यांच्याच पुढाकाराने शहर पोलिस आयुक्तालयाच्या नवीन इमारचीचे काम सुरू आहे. तसेच नव्याने निर्माण करण्यात आलेली पोलिस ठाणी, त्यांच्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ, नवीन वाहने आदी बाबींसाठी अजित पवार यांनी निधी उपलबद्ध करून दिला. त्यामुळे त्यांचे कार्य कामय आठवणीत राहील असे देखील अमितेश कुमार म्हणाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×