Breking News
शोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडापुण्यात खासगी विद्यार्थी वसतिगृहातून लॅपटाॅप चोरीलामाॅडेल काॅलनीत घरफोडी; ९ लाखांचे दागिने चोरीला

लोणी काळभोरमध्ये घरफोडी, ३ लाखांचे दागिने चोरीला

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील ३२ कर्मचाऱ्यांची बदल्या

अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना ४ ते ६ फेबु्रवारी कालावधीत लोणी काळभोरमधील कदमवाक वस्तीजवळील पठारे वस्तीवर घडली आहे. याप्रकरणी महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे विमानतळावर साडेपाच कोटींचा गांजा जप्त – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला लोणी काळभोरमधील पठारे वस्तीवर राहायला आहेत. ४ ते ६ फेबु्रवारी कालावधीत संबंधित कुटूंबिय बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील ३ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. बाहेरून आल्यानंतर तक्रारदार महिलेला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव तपास करीत आहेत.

बुधवार पेठेतील दुकानातून साहित्य चोरीला

शहरातील मध्यवर्ती बुधवार पेठेतील इलेट्रॉनिक दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी १ लाख २५ हजारांचे साहित्य चोरून नेले आहे. ही घटना ११ ते १२ फेबु्रवारी कालावधीत घडली आहे. याप्रकरणी नानापेठेत राहणार्‍या तरूणाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे नाना पेठेत राहायला असून, इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचे दुकान बुधवार पेठेत आहे. ११ ते १२ फेबु्रवारी कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील दीड हजारांची रोकड आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य असा सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×