Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पुणे विमानतळावर साडेपाच कोटींचा गांजा जप्त

पुणे विमानतळावर साडेपाच कोटींचा गांजा जप्त

बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला अटक

marathinews24.com

पुणे – विमानाने बँकॉकहून पुण्यात आलेल्या प्रवाशाने खेळण्यांच्या बॉक्समध्ये लपवलेला तब्बल ५ कोटी ४२ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा पुणे विमानतळावरील कस्टम (सीमाशुल्क) विभागाने जप्त केला. याप्रकरणी बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला अटक केल्याची माहिती कस्टम विभागने दिली आहे.

पुण्यात महिलांचे दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद – सविस्तर बातमी 

परदेशातून हिंदुस्थानातील विविध भागात प्रवास करणार्‍या काही तस्करांकडून वारंवार ड्रग्जची वाहतूक केल्याचे यापुर्वीही उघडकीस आले आहे. त्यापार्श्वभूमीवर तस्करांना पकडण्यासाठी विमानतळावर कस्टमकडून सातत्याने बारकाईने लक्ष्य ठेऊन कारवाई केली जाते. बुधवारी (दि. ११) एअर इंडिया एक्स्प्रेसच्या आयएक्स २४१ विमानातून प्रवासी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला होता. त्याच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्याने त्याच्या साहित्याची कस्टमने तपासणी केली. त्यावेळी पारदर्शक पाकिटांमध्ये हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. संबंधित पाकिटे कार्बन पेपरमध्ये गुंडाळून पाच खेळण्यांच्या बॉक्समध्ये गांजा लपवून ठेवला होता.

कस्टम अधिकार्‍यांनी तत्काळ संपूर्ण माल जप्त केला. तसेच आरोपी प्रवाशाला अंमली पदार्थ विरोधी कायदा (एनडीपीएस), १९८५ अंतर्गत अटक केली आहे. गांजाचे वजन ५ हजार ४२९ ग्रॅम असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात ५ कोटी ४२ लाख एवढी किंमत आहे. याबाबत आरोपी प्रवाशाला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याने गांजा कोठून आणला, तो कोणाला विक्री करणार होता, याचा तपास करण्यात येत आहे. ड्रग्ज रॅकेटमागील इतरांचा शोध घेतला जात असल्याची माहिती कस्टम विभागाने दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×