Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पुण्यात महिलांचे दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद

पुण्यात महिलांचे दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद

 सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरात दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. सिंहगड रस्ता, तसेच विश्रांतवाडी भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलांकडील दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रस्ता भागात सनसिटी रस्त्यावर दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील ९० हजारांचे सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी काळभोरमध्ये घराचे कुलूप तोडून ऐवज लांबविला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५६ वर्षीय महिला सनसिटी रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या गुरुवारी (१२ फेब्रुवारी) दुपारी सनसिटी रस्त्यावरुन निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ९० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर तपास करत आहेत.

दागिने हिसकावणारा चोरटा अटकेत

विश्रांतवाडीतील आळंदी रस्त्यावर एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या चोरट्याला विश्रांतवाडी पोलिसंनी अटक केली. या प्रकरणी मुकेश बाबुलाल राठोड (वय २२, रा. नागपूर ) याला अटक करण्यात आली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला या ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास म्हस्के वस्ती भागातील भाजी मंडईत सूनेसाेबत खरेदीसाठी आल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटा राठोड याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. ज्येष्ठ महिलेने आरडाओरडा केला. राठोड तेथून पसार झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही चित्रीकरणष तसेच दुचाकीच्या वाहन पाटीवरील क्रमांकावरुन पोलिसांनी तपास करुन राठोडला पकडले. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×