Breking News
शोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडापुण्यात खासगी विद्यार्थी वसतिगृहातून लॅपटाॅप चोरीलामाॅडेल काॅलनीत घरफोडी; ९ लाखांचे दागिने चोरीला

लोणी काळभोरमध्ये घराचे कुलूप तोडून ऐवज लांबविला

माॅडेल काॅलनीत घरफोडी; ९ लाखांचे दागिने चोरीला

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना लाेणी काळभोर भागात उघडकीस आली. याबाबत महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बीडमध्ये पोलीस मैदानी चाचणीच्या वेळापत्रकात मोठा बदल – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला लोणी काळभोरमधील पठारे वस्ती भागात राहायला आहेत. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील दोन लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत. दरम्यान, बुधवार पेठेतील इलेक्ट्रीक साहित्याची विक्री करणाऱ्या बाजारपेठेत दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख २५ हजार रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्य चोरुन नेले. व्यावसायिकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार व्यावसायिकाचे बुधवार पेठेतील इलेक्ट्रीक साहित्याची विक्री करणाऱ्या बाजारपेठेत दुकान आहे. चोरट्यांनी ११ फेब्रुवारी राेजी मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडून इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक गोरे तपास करत आहेत.

कात्रजमध्ये बंगल्यातून चंदनाचे झाड कापून नेले

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील एका बंगल्याच्या आवारातून चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चंदन चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि कुटुंबीय कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शेलारमळा परिसरा राहायला आहेत. गुरुवारी मध्यरात्री बंगल्याच्या आवारात चोरटे शिरले. चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत. शहर परिसरात चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×